Sachin Pilgaonkar: ट्रोलर्सवर महागुरूंचं शॉकिंग स्टेटमेंट; असं काही बोलले, कोणीच विश्वास ठेवणार नाही; म्हणाले 'मला पैसे मिळतात...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Sachin Pilgaonkar : गेल्या काही काळापासून सचिनजींना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. अखेर, या ट्रोलिंगवर सचिनजींनी आपल्या खास स्टाईलमध्ये उत्तर देऊन टीकाकारांची बोलती बंद केली आहे.
advertisement
1/8

मराठी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन व्यक्तिमत्त्व म्हणजे सचिन पिळगांवकर. वयाची ६८ वर्षे पूर्ण झाली असली तरी, पडद्यावरचा त्यांचा उत्साह आजही एखाद्या विशीतल्या तरुणाला लाजवेल असाच असतो.
advertisement
2/8
वयाच्या ५ व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार जिंकून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज सहा दशकांनंतरही तितक्याच दिमाखात सुरू आहे. मात्र, जशी प्रसिद्धी मिळते तशी टीकाही सोसावी लागते.
advertisement
3/8
गेल्या काही काळापासून सचिनजींना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. कधी त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून तर कधी त्यांच्या अनुभवांच्या गोष्टींवरून. अखेर, या ट्रोलिंगवर सचिनजींनी आपल्या खास स्टाईलमध्ये उत्तर देऊन टीकाकारांची बोलती बंद केली आहे.
advertisement
4/8
सध्या 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' या कार्यक्रमात परीक्षक म्हणून दिसणारे सचिन पिळगांवकर यांनी नुकतीच 'रेडिओ सिटी मराठी'ला मुलाखत दिली. ट्रोलिंगबद्दल विचारल्यावर ते शांतपणे हसले आणि म्हणाले, "अहो, माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या इतकी अफाट आहे की, या दोन-चार लोकांच्या टीकेने मला काहीच फरक पडत नाही. ज्या दिवशी प्रेम करणारे कमी होतील, त्या दिवशी मी काळजी करीन."
advertisement
5/8
त्यांनी यावेळी शाहरुख खानच्या एका प्रसिद्ध उत्तराचा दाखला दिला. सचिनजी म्हणाले, "कोणीतरी शाहरुखला विचारलं होतं की तुला ट्रोलिंगचा त्रास होतो का? तेव्हा तो म्हणाला होता, जर एखादा माणूस ज्याने आयुष्यात काहीच केलं नाहीये, तो जर मला ट्रोल करून रात्री शांत झोपत असेल, तर त्याच्या सुखाचं कारण मी आहे. हेच माझंही म्हणणं आहे."
advertisement
6/8
सचिनजींनी अतिशय सकारात्मकतेने या गोष्टीकडे पाहिलं आहे. ते मिश्किलपणे म्हणाले, "३१ डिसेंबरला माझ्या करिअरला ६२ वर्ष पूर्ण होऊन आता ६३ वं वर्ष सुरू झालंय. या वयातही जर लोकांना मी इतका महत्त्वाचा वाटत असेन की ते माझ्यावर वेळ खर्च करून ट्रोल करतायत, तर यापेक्षा मोठं यश दुसरं काय असू शकतं?
advertisement
7/8
ते पुढे म्हणाले, "उलट या ट्रोलिंगमुळे मी सोशल मीडियावर इतका फेमस झालोय की मला आता खूप जाहिराती मिळायला लागल्या आहेत. त्यामुळे हेही ठीकच आहे ना!" टीका करणाऱ्यांना त्यांनी मुले संबोधून त्यांना भरभरून आशीर्वादही दिले.
advertisement
8/8
याच मुलाखतीत प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत हिने मात्र थोडी नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली, "एखादा कलाकार किती मेहनतीने शून्यातून विश्व निर्माण करतो, हे लोकांना कळत नाही. जेव्हा कोणी आपल्या मेहनतीवर किंवा कलेवर चुकीच्या पद्धतीने बोलतं, तेव्हा मनाला खूप त्रास होतो."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sachin Pilgaonkar: ट्रोलर्सवर महागुरूंचं शॉकिंग स्टेटमेंट; असं काही बोलले, कोणीच विश्वास ठेवणार नाही; म्हणाले 'मला पैसे मिळतात...'