सचिन पिळगावकरांची चार भिंतीतली ती गोष्ट, सुप्रियांनी सगळ्यांना सांगितली; म्हणाल्या, 'त्यांचे अजूनही...'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगांवकर ही मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन जोडी आहे. सुप्रिया यांनी सचिन पिळगांवकरांबद्दल अशी एक गोष्ट सांगितली जी आजवर कोणालाच माहिती नव्हती.
advertisement
1/7

ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवली. गेली अनेक दशकं ते मराठी सिनेसृष्टीत काम करत आहेत. फक्त अभिनय नाही तर गाणं, संगीत, दिग्दर्शक, निर्माते, लेखक म्हणूनही ते कार्यरत आहेत.
advertisement
2/7
मराठी सिनेसृष्टीतील काही मल्टिटॅलेन्टेट अभिनेत्यांपैकी एक प्रमुख नाव म्हणजे अभिनेते सचिन पिळगांवकर. सचिन यांनी आपल्या दमदार मराठी सिनेमांनी 90 चा काळ गाजवला. एकामागून एक हिट सिनेमे देत एक रेकॉर्ड आपल्या नावे केला.
advertisement
3/7
मराठीच नाही तर सचिन पिळगांवकर यांनी हिंदी सिनेमातही उल्लेखनीय काम केलं आहे. हिंदी सिनेमातूनच त्यांनी बालकलाकार म्हणून पहिलं पाऊल ठेवलं. त्यांना उत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.
advertisement
4/7
सचिन पिळगांवकर सध्या फार सिनेमात दिसत नाहीत. 'नवरा माझा नवसाचा 2' हा त्यांचा शेवटचा रिलीज झालेला सिनेमा आहे. सिनेमांबरोबरच मधल्या काळात त्यांनी ओटीटीवरही काम केलं.
advertisement
5/7
सचिन पिळगांवकर यांचे वडीलही रंगकर्मी होते. वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांनीही अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. सचिन पिळगांवकर हे बालपणापासूनच लाडात वाढले. अनेक दिग्गज हिंदी कलाकारांचा सहभाग त्यांना लाभला आहे.
advertisement
6/7
वयाच्या सत्तरीतही सचिन यांचे लाड होतात. त्यांची पत्नी अभिनेत्री सुप्रिया यांनी स्वत: एका मुलाखतीत हे सांगितलं होतं. सुप्रिया पिळगांवकर म्हणाल्या होत्या, "त्यांच्या आईने त्यांना खूप लाडावलंय. खरंतर त्यांना लाड आवडतात. तुम्ही विचार करा, चार वर्षांचे असल्यापासून ते काम करतात आणि ते किती गोंडस होते हे तुम्हाला माहितीच असेल. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला जे कोणी होते त्यांनी त्यांना बाबाकुताच केलेलं आहे."
advertisement
7/7
"सीरियस नोटवर तुम्ही विचार करा, त्यांना त्या लाडाची सवय आहे आणि त्यांना ते तेवढे लाड आवडतात. त्यांचे अजूनही लाड होतात. त्यांची मुलगी त्यांचे खूप लाड करते. खूप म्हणजे खूप लाड करते. आता आई तसे लाड करत नाही पण मुलगी तसे लाड करते. मला ते कळलेलं आहे की त्यांना ते आवडतं."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सचिन पिळगावकरांची चार भिंतीतली ती गोष्ट, सुप्रियांनी सगळ्यांना सांगितली; म्हणाल्या, 'त्यांचे अजूनही...'