निधनाआधी सचिन यांना शेवटचा Message, सतीश शाह यांच्याशी काय बोलणं झालं? पिळगांवकरांनी दाखवला मेसेज
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sachin Pilgaonkar - Satish Shah : सतीश शाह यांच्या निधनाच्या आधी सचिन पिळगांवकर यांच्याशी त्यांचं शेवटचं बोलणं झालं होतं. सतीश शाह यांचा शेवटचा मेसेज त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
advertisement
1/8

'साराभाई वर्सेस साराभाई' मालिका गाजवणारे बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचं 25 ऑक्टोबर रोजी निधन झालं.
advertisement
2/8
किडन संबंधित आजाराशी ते लढत होते पण त्यांची ही झुंज अपयशी ठरली. सतीश शाह यांच्या निधनाच्या बातमीने इंडस्ट्री हळहळली.
advertisement
3/8
दरम्यान सतीश शाह यांच्याबरोबर मी शेवटचं बोललो होतो असं ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी म्हटलं. सचिन पिळगांवकर यांनी न्यूज18शी बोलताना ही माहिती दिली होती.
advertisement
4/8
त्यानंतर सचिन यांनी सोशल मीडियावर सतीश शाह यांच्याशी झालेल्या शेवटचा मेसेज पोस्ट केला आहे. मित्र गमावल्याचं दु:ख त्यांनी व्यक्त केलं.
advertisement
5/8
सतीश शाह यांच्या निधनाच्या एक दिवसानंतर सचिन पिळगांवकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. "हा माझा मित्र सतीश शाह याने काल दुपारी 12:56 वाजता पाठवलेला शेवटचा मेसेज होता. त्याच्या आत्म्यास शांती लाभो."
advertisement
6/8
शेवटचा मेसेज देखील सचिन पिळगांवकर यांनी दाखवला. त्यात असं लिहिलंय, "माझ्या वयामुळे लोक मला अनेकदा प्रौढ समजतात."
advertisement
7/8
सचिन यांनी न्यूज18शी बोलताना सांगितलं, "सुप्रिया 3 दिवसांपूर्वी सतीश आणि मधुला भेटायला गेली होती. मी शूटिंगमध्ये बिझी होतो त्यामुळे जाऊ शकलो नाही. त्यांनी तिथे गाणी लावली होती. त्यावर सुप्रिया आणि मधुने डान्सही केला."
advertisement
8/8
सचिन यांनी पुढे सांगितलं, "आम्ही दोघे सतत मेसेजवर बोलत होतो. खरं सांगायचं तर आज दुपारी 12:56ला मला त्यांचा एक मेसेज आला. त्याच्या जाण्याने इंडस्ट्रीचं मोठं नुकसान झालं आहेच पण ही माझ्यासाठीही खूप मोठी वैयक्तिक हानी आहे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
निधनाआधी सचिन यांना शेवटचा Message, सतीश शाह यांच्याशी काय बोलणं झालं? पिळगांवकरांनी दाखवला मेसेज