रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट! अक्षय कुमारच्या 'भूतबंगला'ला टक्कर द्यायला येतेय ही मराठी फिल्म
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अक्षय कुमारचा भूत बंगला 16 एप्रिलला रिलीज होणार आहे. या हॉरर कॉमेडी सिनेमाला टक्कर देण्यासाठी रहस्य, थराराने भरलेला मराठी सिनेमा येतोय.
advertisement
1/8

अक्षय कुमारचा 'भूत बंगला' सिनेमा येत्या 16 एप्रिलला रिलीज होणार आहे. या सिनेमाचा पेड प्रीव्ह्यू होणार आहे. अनेक दिवसांपासून या सिनेमाची चर्चा सुरू आहे.
advertisement
2/8
हॉरर कॉमेडी असलेल्या या सिनेमात नेमकं काय पाहायला मिळणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून आहे. मनोज जोशी, मिथिला पालकर, राजेश शर्मा, राजपाल यादव, परेश रावल, तब्बू सारखी तगडी स्टारकास्ट या सिनेमा मिळणार आहे.
advertisement
3/8
एकीकडे भूतबंगला तर दुसरीकडे भूतबंगलाला टक्कर देण्यासाठी मराठी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
advertisement
4/8
पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
advertisement
5/8
या सिनेमाचं नाव आहे 'सालबर्डी'. सालबर्डी या एका छोट्याशा गावात घडणाऱ्या विचित्र घटनांनी निर्माण झालेली भीती आणि त्या भीती मागचं सत्य शोधण्याची धडपड ही 'सालबर्डी'ची मध्यवर्ती कथा आहे
advertisement
6/8
भय आणि भ्रमाच्या छायेत घडणाऱ्या भीतीदायक घटनांमागचं गूढ उलगडण्याचा थरारक प्रवास ‘सालबर्डी’ या चित्रपटातून येत्या 17 एप्रिलला प्रेक्षकांसमोर येणार आहे. रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट यांचा एकत्रित संगम असलेला 'सालबर्डी' प्रेक्षकांसाठी रंजक सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.
advertisement
7/8
चित्रपटाचे छायांकन व संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. पटकथा व संवाद रोहित शुक्रे यांचे असून, गुरु ठाकूर आणि मुकुंद भालेराव यांच्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली आहे.
advertisement
8/8
अजय गोगावले, जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने चित्रपटातील गाणी सजली आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि आशीष पाटील यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते दीपक कुदळे पाटील असून, वेशभूषा प्रणिता चिंदगे, रंगभूषा श्रीनिवास मेनूगे आणि कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट! अक्षय कुमारच्या 'भूतबंगला'ला टक्कर द्यायला येतेय ही मराठी फिल्म