नवरा बाहेर गेला, शेजाऱ्याकडून विवाहितेवर अत्याचार, तिचं बाळही मारलं, कोर्टाने जन्माची अद्दल घडवली
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
पीडित महिलेने मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र आरोपीने तिच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला जखमी अवस्थेत सोडून तिथून पळ काढला.
advertisement
1/5

गडचिरोली जिल्ह्यात विवाहितेवर बलात्कार करण्याच्या प्रयत्नात असताना आडवा आलेल्या तीन वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला अहेरीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.
advertisement
2/5
मुलचेरा तालुक्यातील कांचनपूर येथे १९ जून २०१७ ला पीडित महिला तीन वर्षाच्या मुलासह घरात होती. तिचा पती उदरनिर्वाहासाठी आंध्र प्रदेशात गेला होता.
advertisement
3/5
त्यावेळी शेजारी असलेल्या संजू सरकार हा मध्यरात्री त्यांच्या घरात घुसला. आणि त्या महिलेवर त्याने बलात्कार केला. यावेळी आईजवळ झोपलेल्या तीन वर्षे मुलाला जाग आली. रडणाऱ्या मुलाचे नाक आणि तोंड दाबून आरोपीने त्याला ठार केले.
advertisement
4/5
यावेळी पीडित महिलेने मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र आरोपीने तिच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला जखमी अवस्थेत सोडून तिथून पळ काढला.
advertisement
5/5
गावकऱ्यांनी या संदर्भात जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. आरोपीला भारतीय दंड विधान कलम 302 अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावली. तसेच बलात्कार आणि खुनचा प्रयत्न केल्याबद्दल जन्मठेप आणि घरफोडीसाठी दहा वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
नवरा बाहेर गेला, शेजाऱ्याकडून विवाहितेवर अत्याचार, तिचं बाळही मारलं, कोर्टाने जन्माची अद्दल घडवली