Salman Khan : या गाण्यात खरोखर रडला होता सलमान खान; 'हम दिल दे चुके सनम'मधील नाहीच, मग कोणतं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Salman Khan Cry In Song : सलमान खानचे कित्येक फिल्म्स, गाण्यात रडणारे सीन आहेत. पण एक अशी फिल्म ज्याच्या गाण्यात सलमान खान खरं रडला होता. फराह खानने तो किस्सा सांगितला आहे.
advertisement
1/7

अभिनेता सलमान खानचं रडणं म्हटलं की सगळ्यात आधी तुमच्या समोर येईल ती 'हम दिल दे चुके सनम' ही फिल्म. ऐश्वर्यावर प्रेम करणाऱ्या सलमानचे या फिल्ममध्ये रडतानाचे सीन होते. फिल्ममधील 'तडप तडप के' या गाण्यात तो रडताना दिसला. त्यामुळे एका गाण्यात सलमान खान खरंच रडला असं म्हटलं की सगळ्यात आधी हीच फिल्मला तुम्हाला वाटेल याचं कारण म्हणजे सलमानचं ऐश्वर्यावर असलेलं प्रेम.
advertisement
2/7
एका गाण्यात सलमान खान खरंच रडला, ते गाणं तुम्हाला हम दिल दे चुके सनम फिल्ममधील वाटेल. पण तसं बिलकुल नाही. सलमानचं हे गाणं वेगळ्याच फिल्ममधील आहे.
advertisement
3/7
फराह खानने अलिकडे सलमान खानच्या एका फिल्मचा किस्सा शेअर केला आहे. ज्यात तिने या फिल्ममध्ये त्याने ग्लिसरीन वापरलं नव्हतं तो खरंच रडला होता, असं तिनं सांगितलं.
advertisement
4/7
2006 साली रिलीज झालेली सलमानची ही फिल्म बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाली. या फिल्मचं बजेट 35 कोटी रुपये होतं. पण फिल्मने भारतात बॉक्स ऑफिसवर फक्त 25.12 कोटींची कमा केली.
advertisement
5/7
पण या फिल्ममधील गाणी मात्र हिट झाली होती. यातील एक गाणं ज्यात न्यूयॉर्क ब्रुकलीन ब्रीजचं दृश्य दाखवण्यात आलं आहे. या ब्रीजवर सलमानचा इमोशनल सीन आहे, तो रडताना दिसला.
advertisement
6/7
आता ही फिल्म कोणती हे एव्हाना काही जणांना समजलंही असेल आणि नाही समजलं त्यांना आम्ही सांगतो. ही फिल्म आहे. जान ए मन.ज्यात सलमानसह प्रीती झिंटा आणि अक्षय कुमार यांची भूमिका आहे. या फिल्ममधील सौ दर्द हे गाणं या गाण्यात सलमान खरोखर रडल्याचं फराह म्हणाली.
advertisement
7/7
रणवीर इलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये फराह खान म्हणाली, "सलमानला मी पहिल्यांदाच त्याच्या वेदना अशा पद्धतीने व्यक्त करताना पाहिलं होतं. तो तिथंच रडत उभा होता, आम्हाला शॉट कट करायचा नव्हता. आम्ही फक्त त्याच्याभोवती कॅमेरा फिरवत होतो"
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Salman Khan : या गाण्यात खरोखर रडला होता सलमान खान; 'हम दिल दे चुके सनम'मधील नाहीच, मग कोणतं?