Hyundai Verna किती पगार असलेल्या लोकांनी खरेदी करावी? पाहा EMIचं गणित
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
कोणतीही कार खरेदी करण्यापूर्वी त्या कारच्या पैशांचं गणित लावणं खुप गरजेचं असतं. तुम्ही ईएमआयवर कार खरेदी करणार असाल तर हे अत्यंत महत्वाचं ठरतं. आज आपण 2026 Hyundai Verna च्या ईएमआयचं गणित जाणून घेऊया.
advertisement
1/7

2026 Hyundai Verna ही नुकतीच नव्या अपडेटसह लॉन्च झाली आहे. तुम्हाला ही कार खरेदी करायची इच्छा असेल पण ईएमआयचं गणित कसं असेल हे कळत नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. कारण किती पगार असलेल्या लोकांनी ही गाडी खरेदी करायला हवी आणि ईएमआयचं गणित कसं असेल हे आपण आज जाणून घेणार आहोत.
advertisement
2/7
2026 Hyundai Verna ची दिल्लीमध्ये एक्स शोरूम किंमत फक्त 10,98,400 रुपये ठेवण्यात आली आहे. तसंच याचं टॉप स्पेक व्हेरिएंट 18,40,400 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
advertisement
3/7
तुम्हीही येत्या काही दिवसांमध्ये नवी वरना खरेदी करण्याचं प्लॅनिंग करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आज आपण या कारची On Road Price आणि EMI Details विषयी जाणून घेणार आहोत. चला जाणून घेऊया किती हप्ता येईल.
advertisement
4/7
वर्नाची एक्स शोरूम प्राइज ही 10.98 लाख रुपयांपासून सुरू होते. तुम्ही ही दिल्लीमध्ये खरेदी करू इच्छित असाल तर Verna च्या बेस व्हेरिएंटवर तुम्हाला 1,21,840 रुपये RTO फीस द्यावी लागेल. यासोबतच 54,447 रुपयांचं इन्शुरन्स अमाउटं आणि 11,484 रुपयांचे इतर चार्जेस द्यावे लागू शकतात. अशा प्रकारे हुंडई वर्नाची ऑन रोड किंमत 12,86,171 रुपये होते.
advertisement
5/7
तुम्ही ब्रांड न्यू वर्ना खरेदी करताना 2 लाख रुपये डाउम पेमेंट दिली. तर उर्वरीत 10,86,171 रुपये तुम्हाला कार लोन घ्यावं लागेल. तुमची मासिक कमाई चांगली असेल आणि क्रेडिट स्कोअरही चांगल्या स्थितीत असेल तर तुम्हाला 10 टक्क्याच्या व्याजदरावर हे लोन सहज मिळेल.
advertisement
6/7
समजा तुम्ही Car Loan हे 5 वर्षांसाठी घेतले. तर तुम्हाला 10 टक्के व्याजदरावर 23,078 रुपयांचे एकूण 60 ईएमआय भरावे लागतील. म्हणजेच एकूण 13,84,675 रुपयांचे हप्ते भरावे लागतील. तुम्ही 2 लाख रुपये डाउन पेमेंट जोडले, तर या कारची किंमत 15,84,675 रुपये (व्याज आणि ईएमआयनंतर) होते.
advertisement
7/7
आमचा सल्ला : वर सांगितलेल्या गाडीची ऑन-रोड प्राइज आणि ईएमआय डिटेल्स एक महत्त्वाचं उदाहरण आहे. हे आकडे शहर, डीलरशिप, आरटीओ आणि इन्शुरन्स कंपनीच्या हिशोबाने बदलू शकतात. तुम्ही महिन्यात 60-80 हजार रूपये कमवत असाल आणि सध्या मोठं कोणतंही लोन तुमच्या डोक्यावर नसेल तर ही कार ईएमआयवर खरेदी करु शकता.