रेशनिंग अधिकारी दीपक डोळस यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कल्याण- डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रामध्ये गॅस सिलिंडरचा आणि पंपांवर पेट्रोल- डिझेलचा सध्या पुरेसा पुरवठा आहे. घाबरून जाऊन सिलिंडर आणि पेट्रोल- डिझेलच्या गाड्यांच्या टाक्या पुन्हा भरण्याची किंवा खरेदी करण्याची घाई करण्याची गरज नाही." त्यांनी नागरिकांना असे आवाहन केले की, सोशल मीडियावर पसरवणाऱ्या अफवांवर दुर्लक्ष करा, कारण अशा अफवांमुळेच गॅस एजन्सीच्या कार्यालयाबाहेर आणि पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होते. ज्यामुळे ज्यांना खरोखरच गरज आहे, अशांना ती गोष्ट मिळत नाही.
advertisement
डोल्स यांनी नागरिकांना गॅस सिलिंडरच्या बुकिंगबद्दलही माहिती दिली, ते म्हणाले की, "सध्या दुसरा घरगुती एलपीजी सिलिंडर नागरिकांना पहिला बुकिंग केल्याच्या 25 दिवसांनंतरच बुक करता येणार आहे. त्यामुळे विनाकारण नागरिकांनी गॅस बुकिंग कार्यालयाच्या बाहेर रांगा लावू नयेत. सर्व नागरिकांना बुकिंग नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय, सध्या कल्याण- डोंबिवली क्षेत्रामध्ये सुरळीत गॅस पुरवठा असून प्रत्येकाला घरपोच गॅस सिलिंडर मिळणार आहे. सर्व परिस्थिती पुर्व पदावर येईपर्यंत प्रत्येकाने संयम बाळगण्याचा सल्ला सुद्धा त्यांनी दिला आहे.
शिवाय, रेशनिंग ऑफिसरने ठाणे जिल्ह्यामध्ये जर कुठे एलपीजी गॅस सिलिंडरचा जर कुठे काळाबाजार होत असल्यास नागरिकांनी तक्रार करावी असे आवाहन त्यांनी केले. अशा प्रकारच्या घटना आढळल्यास रहिवाशांनी तात्काळ रेशनिंग विभागाच्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा जेणेकरून कठोर कारवाई करता येईल. इंधन पुरवठ्याचे आणि गॅस सिलिंडरचे अगदी व्यवस्थित वितरण केले जाणार आहे. नागरिकांनी संयम बाळगावा, सोबतच रेशनिंग अधिकाऱ्यांनाही सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
