TRENDING:

वारी म्हणजे नेमकं काय?, दरवर्षी वारीला जाणाऱ्या अभिनेता संदीप पाठकनं सांगितला अनुभव

Last Updated:
आषाढी वारीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. वारी सुरू झाली की वारी म्हणजे काय? आषाढी म्हणजे काय? असे प्रश्न अनेकांना पडतात. त्याचं उत्तर देतोय अभिनेता संदीप पाठक.
advertisement
1/7
वारी म्हणजे नेमकं काय? दरवर्षी वारीला जाणाऱ्या संदीप पाठकनं सांगितला अनुभव
आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती म्हणजे पंढरीच्या वारीची. असंख्य वारकरी तन्मयतेने, निरपेक्षपणे त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी जातात. हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो.
advertisement
2/7
महाराष्ट्राच्या संस्कृतीचं भूषण असलेली ही पंढरीची वारी तीनशे ते चारशे वर्ष अविरत सुरू आहे आणि ती पुढेही राहील पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्त्व काय? उदिष्ट्य काय? याविषयी क्वचितच माहिती असते.
advertisement
3/7
वारीची दिव्य परंपरा गाण्याच्या माध्यमातून सोप्या आणि सध्या शब्दात उलगडणार आहे. वारीचा आनंदानुभव देणारं हे गाणं गीतकार गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केलं आहे. मनीष राजगिरे यांचा आर्त स्वर या गाण्याला लाभला असून विजय गवंडे यांनी गाण्याला संगीत दिले आहे.
advertisement
4/7
अभिनेता संदीप पाठक याचं 'जगात भारी पंढरीची वारी' हे चैतन्यमय गाणं रिलीज होतंय. या गाण्याच्या निमित्तानं संदीपनं त्याचा इतक्या वर्षांचा वारीचा अनुभव सांगितला.
advertisement
5/7
संदीप पाठक म्हणाला, "हा आनंद जगात कुठेच नाही आणि तो मिळणारही नाही, त्यामुळेच मी या वारीत सहभागी होतो. वारीत सहभागी होणार प्रत्येकजण समाधानाची वाट शोधत असतो".
advertisement
6/7
"इथे प्रत्येक जण वारकरी म्हणूनच सहभागी झालेला असतो. मला ही वारी नवी नसली तरी दरवेळी तिचा नवा अनुभव आयुष्य समृद्ध करणारा असतो", असं संदीप म्हणाला.
advertisement
7/7
संदीप पुढे म्हणाला, "ज्यांना वारीचा सोहळा अनुभवायला मिळत नाही अशांपर्यंत वारीचा प्रत्येक क्षण पोहचवणे, घरबसल्या वारीचं दर्शन त्यांना करून देणे आणि नव्या पिढीला या परंपरेची ओळख व्हावी यासाठी 'जगात भारी पंढरीची वारी' हा कार्यक्रम आम्ही आणला आहे".
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
वारी म्हणजे नेमकं काय?, दरवर्षी वारीला जाणाऱ्या अभिनेता संदीप पाठकनं सांगितला अनुभव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल