TRENDING:

Interesting Facts : तुम्ही विकत घेतलेल्या फळांवर स्टिकर्स का असतात? सजग व्हा, कोडचा अर्थ समजून घ्या..

Last Updated:
तुमच्या कधी हे लक्षात आलं आहे का की बाजारात गेल्यानंतर दुरूनच चमकदार, स्वच्छ दिसणाऱ्या आणि स्टिकर्स असलेल्या फळांकडे आपलं लक्ष आकर्षित होतं.
advertisement
1/7
तुम्ही विकत घेतलेल्या फळांवर स्टिकर्स का असतात? सजग व्हा, कोडचा अर्थ समजून घ्या..
फळं खाणं आरोग्यासाठी अतिशय चांगलं असतं. परंतु ती ताजी आणि फ्रेश असणं गरजेचं आहे. तुम्ही देखील बाजारात फळं खरेदी करण्यासाठी जाता तेव्हा ताजी फळं पाहून खरेदी करत असाल. परंतु तुमच्या कधी हे लक्षात आलं आहे का की बाजारात गेल्यानंतर दुरूनच चमकदार, स्वच्छ दिसणाऱ्या आणि स्टिकर्स असलेल्या फळांकडे आपलं लक्ष आकर्षित होतं.
advertisement
2/7
अनेकजण ती फळं फ्रेश समजून खरेदी करतात. पण तुम्ही कधी त्या फळांवरील स्टिकर्स वाचले आहे का? कारण बहुतेक लोक ते न वाचताच खरेदी करतात. परंतु फळांवरील हे स्टीकर्स अतिशय महत्त्वाचे असतात. त्यामुळे त न वाचता काढून टाकतात आणि फेकून देतात. पण यानंतर तुम्ही जेव्हा केव्हा फळं खरेदी करण्यासाठी बाजारात जाल तेव्हा त्यावरील स्टिकर नक्की वाचा.
advertisement
3/7
कारण फळांवरील या स्टीकर्सवर फळांची संपूर्ण माहिती दडलेली असते. फळांवरील या लहान स्टिकर्सना पीएलयू (प्राइस लुक-अप) कोड म्हणतात. हे कोड त्या फळाची किंमत दर्शवतात आणि फळाच्या लागवडीबद्दलही माहिती देतात. यामुळे तुम्हाला ते फळ तुमच्यासाठी किती उपयोगी आहे याचा अंदाज येऊ शकतो.
advertisement
4/7
चार-अंकी कोड: तुम्ही विकत घेतलेल्या फळावरील स्टिकरवर फक्त चार अंक असतील आणि त्याची सुरुवात 3 किंवा 4 ने होत असेल, तर याचा अर्थ ते फळ पारंपरिक पद्धतीने पिकवले गेले आहे असा होतो. या फळाच्या लागवडीत कीटकनाशके आणि रासायनिक खतांचा वापर केला गेला आहे. ते खाण्यापूर्वी पूर्णपणे धुणे महत्त्वाचे आहे.
advertisement
5/7
पाच-अंकी कोड: फळावर जर कोड पाच अंकी असेल आणि पहिला अंक 9 असेल, तर ते सर्वोच्च गुणवत्ता दर्शवते. याचा अर्थ फळ पूर्णपणे नैसर्गिकरित्या वाढवले ​​गेले आहे. कोणतीही हानिकारक रसायने किंवा कीटकनाशके वापरली गेली नाहीत. ते तुमच्या आरोग्यासाठी सर्वात सुरक्षित आहे.
advertisement
6/7
पाच-अंकी कोड: जर कोड पाच अंकी असेल आणि पहिला अंक 8 असेल तर तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. याचा अर्थ ते फळ जनुकीयदृष्ट्या बदलेले आहे. याचा अर्थ फळाच्या बिया प्रयोगशाळेत बदलल्या गेल्या आहेत. जेणेकरून त्या मोठ्या दिसतील किंवा लवकर खराब होणार नाहीत. हे बाजारात कमी प्रमाणात दिसत असले तरी, ते 'नैसर्गिक' मानले जात नाही. (All Images - AI)
advertisement
7/7
यापुढे तुम्ही जेव्हा केव्हा फळं घेण्यासाठी बाजारात जाल तेव्हा स्टिकर्स आणि त्यावर असलेले कोड नक्की तपासा. यामुळे तुम्हाला तुम्ही विकत घेत असलेल्या फळांचा दर्जा कळेल आणि ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरणार नाही. त्यामुळे सजग व्हा आणि फळं खरेदी करताना स्टिकर्स नक्की तपासा. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Interesting Facts : तुम्ही विकत घेतलेल्या फळांवर स्टिकर्स का असतात? सजग व्हा, कोडचा अर्थ समजून घ्या..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल