TRENDING:

भाईजानसोबत स्टेज शेअर करणे पडले महागात! आणखी एका सुपरस्टारला खतरनाक गँगस्टरची धमकी

Last Updated:
Pawan Singh: सलमान खानला धमकी देणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई गँगने आता पवन सिंह यांना लक्ष्य केले असून, शोमध्ये दिसल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली आहे.
advertisement
1/7
भाईजानसोबत स्टेज शेअर करणे पडले महागात! सुपरस्टारला खतरनाक गँगस्टरची धमकी
मुंबई: 'बिग बॉस १९'च्या महाअंतिम सोहळ्यात अभिनेता सलमान खानसोबत स्टेज शेअर करणे भोजपुरी स्टार पवन सिंहला चांगलेच महागात पडले आहे. सलमान खानला धमकी देणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई गँगने आता पवन सिंह यांना लक्ष्य केले असून, शोमध्ये दिसल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली आहे. यानंतर पवन सिंहने त्वरित मुंबई पोलिसांकडे धाव घेतली आहे.
advertisement
2/7
'पॉवरस्टार' म्हणून ओळख असलेल्या पवन सिंह याने नुकतेच सोशल मीडियावर जाहीर केले होते की, तो 'बिग बॉस १९' च्या अंतिम सोहळ्यात सलमान खानसोबत परफॉर्म करणार आहे. बिश्नोई गँगच्या नावावर एका अज्ञात व्यक्तीने पवन सिंहला फोन करून सलमान खानसोबत स्टेजवर न येण्याची धमकी दिली.
advertisement
3/7
तसेच, त्याच्याकडे खंडणीची मागणीही केली गेली. धमकी देणाऱ्याने पवन सिंहला, "शेड्यूलनुसार परफॉर्म केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील," अशी धमकी दिली.
advertisement
4/7
धमकी मिळाल्यानंतर पवन सिंह यांच्या टीमने कोणतीही जोखीम न घेता मुंबई पोलिसांशी संपर्क साधला. पवन सिंह यांच्या टीमने मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी सेलमध्ये दोन वेगवेगळ्या लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत.
advertisement
5/7
रिपोर्टनुसार, अज्ञात व्यक्तींनी अनेक फोन नंबरचा वापर करून पवन सिंह आणि त्याच्या टीममधील सदस्यांना धमकीचे मेसेज पाठवले आहेत. या कनेक्शनचा तपास बिहार ते मुंबईपर्यंत सुरू आहे. दरम्यान, 'बिग बॉस'च्या ग्रँड फिनालेमध्ये पवन सिंह यांनी सलमान खान आणि नीलम गिरीसोबत परफॉर्मन्स दिला होता.
advertisement
6/7
यापूर्वीही बिश्नोई गँगकडून सलमान खानसोबत काम करणाऱ्या किंवा स्टेज शेअर करणाऱ्या कलाकारांना धमकी देण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी कपिल शर्माला देखील 'द कपिल शर्मा शो'मध्ये सलमानसोबत स्टेज शेअर न करण्याची धमकी मिळाली होती.
advertisement
7/7
मुंबई पोलिसांनी या धमकीचा स्रोत शोधण्यास सुरुवात केली असून, पवन सिंह यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती पाऊले उचलली आहेत. 'भाईजान' सोबतच्या मैत्रीमुळे पवन सिंह याच्यावर हे संकट आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
भाईजानसोबत स्टेज शेअर करणे पडले महागात! आणखी एका सुपरस्टारला खतरनाक गँगस्टरची धमकी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल