पडद्यावर नाही तर रिअलमध्येही वेगळाच क्लायमॅक्स, 50 वर्षांनी 'शोले' री- रिलीज; पाहायला उरले फक्त दोनच हिरो
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sholay Cast : शोले हा सिनेमा 50 वर्षांनी पुन्हा रिलीज होणार आहे. सिनेमा त्याच्या डिलीट केलेल्या सीन्ससह म्हणजेच रिअल क्लायमॅक्ससह रिलीज होणार आहे. पण रि-रिलीज होणारा शोले पाहण्यासाठी आता फक्त दोनच अभिनेते जिवंत आहेत. शोले सिनेमात फक्त पडद्यावरच नाही तर रिअलमध्येही क्लायमॅक्स बदलला आहे.
advertisement
1/13

केस्टो मुखर्जी - 'शोले' मध्ये हरिराम नाईच्या भूमिकेतून केस्टो मुखर्जी त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 3 मार्च 1982 साली त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. चित्रपटसृष्टीने उत्कृष्ट विनोदी कलाकार गमावला.
advertisement
2/13
संजीव कुमार - ठाकूर बलदेव सिंगचं प्रभावी व्यक्तिमत्त्व पडद्यावर जिवंत करणारे संजीव कुमार 'शोले'चा आत्मा होते. वयाच्या 47 व्या वर्षी 6 नोव्हेंबर 1985 रोजी त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला.
advertisement
3/13
ओम शिवपुरी - शोलेमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेतून ओम शिवपुरी यांनी अधिक वास्तववादी स्पर्श दिला. 15 ऑक्टोबर 1990 रोजी त्यांचाही हार्ट अटॅकने मृत्यू झाला.
advertisement
4/13
अमजद खान- शोलेचा गब्बर, हे आयकॉनिक पात्र साकारणारे अभिनेते अमजद खान आजही सिनेमाच्या इतिहासात जिवंत आहे. 27 जुलै 1992 रोजी 51व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. हार्ट अटॅक त्यांच्या मृत्यूचं कारण ठरलं.
advertisement
5/13
सत्येन कप्पू - रामलालच्या सोज्वळ भूमिकेतून सत्येन कप्पू त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. 27 ऑक्टोबर 2007 रोजी वयाच्या 76 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
advertisement
6/13
मॅक मोहन- अभिनेते मॅक मोहन शोलेमध्ये गब्बरच्या लोकांचा रोल त्यांनी केला होता. त्यांना फुफ्फुसांचा कॅन्सर झाला होता. 10 मे 2010 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
advertisement
7/13
ए. के. हंगल - शोमध्ये रहीम चाचाच्या भूमिकेतील त्यांची साधी, मृदू स्वभावाने प्रेक्षकांनी मनं जिंकली. 26 ऑगस्ट 2012 रोजी वयाच्या 98 व्या ते बाथरूममध्ये घरसले होते. त्यानंतर दहा दिवसांनी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
advertisement
8/13
विजू खोटे - कालिया म्हटलं की आठवण होते ती विजू खोटे यांची. विजू खोटे या मराठमोळ्या अभिनेत्यानं या पात्राला एक वेगळाच वेगळा रंग दिला. 30 सप्टेंबर 2019 रोजी अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचं निधन झालं.
advertisement
9/13
जगदीप - सुरमा भोपालीच्या भूमिकेने जगदीप यांनी शोलेमध्ये प्रेक्षकांंचं मनोरंजन केलं. 8 जुलै 2020 रोजी वयाच्या 81 व्या वर्षांनी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
advertisement
10/13
असरानी - ब्रिटिश काळातील जेलरच्या भन्नाट भूमिकेने असरानी यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. 20 ऑक्टोबर 2025 रोजी वयाच्या 84 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
11/13
शोलेमधील जय म्हणजेच अभिनेते अमिताभ बच्चन हयात आहेत. वयाच्या 80 व्या वर्षीही ते अभिनयात सक्रीय आहे.
advertisement
12/13
अभिनेते सचिन पिळगांवकर यांनीही शोलेमध्ये काम केलं आहे. शोमध्ये त्यांचे खूप कमी सीन्स होते पण त्यांची भुमिका महत्त्वाची होती. सचिन पिळगांवकर शोमधील पुरूष कलाकारांमध्ये हयात असलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. सचिन पिळगांवकर आणि अमिताभ बच्चन यांचा शोलेमध्ये मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. आज 50 वर्षांनी दोघेही खऱ्या आयुष्यात जीवंत आहेत.
advertisement
13/13
अमिताभ बच्चन आणि सचिन पिळगांवकर यांच्याबरोबरच शोमधील बसंती म्हणजेच अभिनेत्री हेमा मालिनी आणि जया बच्चन या दोन अभिनेत्री देखील आजही सिनेमात सक्रीय आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पडद्यावर नाही तर रिअलमध्येही वेगळाच क्लायमॅक्स, 50 वर्षांनी 'शोले' री- रिलीज; पाहायला उरले फक्त दोनच हिरो