'लोकांना त्यांचे दोष दाखवणं...', अभिजीत सावंतने का घेतला Bigg Boss मध्ये जाण्याचा निर्णय? शोनंतर एका वर्षाने मोठा खुलासा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Abhijeet Sawant: अभिजीतने या शोमध्ये केवळ खेळच खेळला नाही, तर प्रेक्षकांची मनंही जिंकली. तो उपविजेता ठरला, पण या शोमध्ये जाण्याचा त्याचा उद्देश ट्रॉफी जिंकण्यापेक्षा काहीतरी वेगळाच होता.
advertisement
1/8

मुंबई: २००५ साली अख्खा देश ज्याच्या आवाजावर फिदा होता, ज्याला पहिला 'इंडियन आयडल' म्हणून डोक्यावर घेतलं होतं, तो म्हणजे आपला लाडका अभिजीत सावंत. सोज्वळ चेहरा, गोड आवाज आणि तितकाच नम्र स्वभाव.
advertisement
2/8
पण मधेच हा आयडल ग्लॅमरच्या दुनियेपासून कुठेतरी हरवला होता. अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनातून तो गेला नव्हता, पण पडद्यावरून मात्र गायब झाला होता. अशातच 'बिग बॉस मराठी'च्या ५ व्या पर्वात त्याची एन्ट्री झाली आणि पुन्हा एकदा 'अभिजीत सावंत' हे नाव घराघरात घुमलं.
advertisement
3/8
अभिजीतने या शोमध्ये केवळ खेळच खेळला नाही, तर प्रेक्षकांची मनंही जिंकली. तो उपविजेता ठरला, पण या शोमध्ये जाण्याचा त्याचा उद्देश ट्रॉफी जिंकण्यापेक्षा काहीतरी वेगळाच होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने यामागचं एक अतिशय खाजगी कारण सांगितलं आहे.
advertisement
4/8
अभिजीतने 'आरपार'ला दिलेल्या मुलाखतीत अत्यंत प्रांजळपणे कबुली दिली की, तो बिग बॉसमध्ये केवळ प्रसिद्धीसाठी गेला नव्हता. तो म्हणाला, "बाहेरचे लोक मला नेहमी म्हणतात की मी खूप चांगला माणूस आहे. पण कधीकधी आपल्याला स्वतःबद्दलच शंका येते. मी खरंच इतका चांगला आहे का? माझ्यातही काही दोष असतीलच ना, मग ते दोष काय आहेत; ते मला जाणून घ्यायचं होतं."
advertisement
5/8
अभिजीतच्या मते, सर्वांमध्येच काहीनं काही दोष असतातच. तुम्ही त्याच्यावर कसं काम करता, हे महत्त्वाचं आहे. एखाद्याला तुम्ही त्याच्यातले दोष दाखवता, तेव्हा तुमचं चांगलं वर्तनही दाखवू शकता. नाही तर काही लोकांना त्यांचे दोष दाखवणं जास्त गरजेचं वाटतं. पण त्याला स्वतःला ओळखायचं होतं, स्वत:ला जाणून घ्यायचं होतं. म्हणून तो बिग बॉस मध्ये गेलो.
advertisement
6/8
अभिजीत सावंत एका मोठ्या काळानंतर पडद्यावर परतला होता. मध्यंतरीच्या काळात तो नक्की कुठे आहे? काय करतोय? यावर अनेक उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. प्रसिद्धी झोतातून अचानक शांततेत जगण्याचा निर्णय त्याने घेतला. मात्र, बिग बॉसमध्ये जाण्याने त्याला केवळ स्वतःला ओळखण्याची संधी मिळाली नाही, तर प्रेक्षकांशी पुन्हा नातं जोडण्याचं एक मोठं व्यासपीठ मिळालं.
advertisement
7/8
जरी या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला असला, तरी अभिजीतने ज्या संयमाने आणि समजूतदारपणाने खेळ केला, त्याचं कौतुक सोशल मीडियावर आजही होतंय. स्वतःचे दोष मान्य करण्याची तयारी आणि स्वतःवर काम करण्याची जिद्द यामुळेच तो उपविजेतेपदापर्यंत पोहोचला.
advertisement
8/8
अभिजीत म्हणतो, "प्रत्येकात दोष असतातच. पण ते स्वीकारून तुम्ही त्यावर कसं काम करता आणि समोरच्याशी असलेलं तुमचं वर्तन कसं टिकवून ठेवता, यातच तुमचं मोठेपण असतं."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'लोकांना त्यांचे दोष दाखवणं...', अभिजीत सावंतने का घेतला Bigg Boss मध्ये जाण्याचा निर्णय? शोनंतर एका वर्षाने मोठा खुलासा