Shreya Ghoshal : अरिजीत सिंहनंतर श्रेया घोषालही गाणं सोडणार? म्हणाली, ' ...त्याचा मला खूप त्रास होतो'
- Published by:Priya Lad
Last Updated:
Shreya Ghoshal : अरिजीत सिंहच्या प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्तीच्या घेतल्याच्या निर्णयानंतर श्रेया घोषालनेही चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.
advertisement
1/7

अरिजीत सिंगच्या प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्तीच्या घेतल्याच्या निर्णयावर त्याच्या चाहत्यांचा अजूनही विश्वास बसत नाही आहे, तो गायिका श्रेया घोषालनेही चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.
advertisement
2/7
श्रेया घोषालनेही गाणं सोडण्याचे संकेत दिले आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्रेयाने आपला हा धाडसी निर्णय जाहीर केला आहे. श्रेयाला मुलाखतीत अरिजीत सिंगची प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्ती आणि लाइव्ह सिंगगवेळी स्टेजवर लिप सिंकिंग याबाबत विचारण्यात आलं. त्यावर श्रेयाने आपलं मत मांडलं आहे.
advertisement
3/7
श्रेया घोषालने अरिजीत सिंहच्या प्ले बॅक सिंगिंगमधून निवृत्तीच्या निर्णयाचं कौतुक केलं आणि त्याला धाडसी पाऊल म्हटलं. ती म्हणाली, "अरिजीत हा संगीताशी खोलवर जोडलेला आहे. तो मनापासून एक संगीतकार आहे. तो संगीत का बनवत आहे. त्यातून त्याला काय मिळेल याचा तो विचार करत नाही. तो फक्त त्याला आनंद मिळेल तेच करतो. तेच त्याने केलं. कधीकधी मलाही ब्रेक घ्यावासा वाटतो"
advertisement
4/7
लाइव्ह शोमध्ये लिप सिंकिंग बाबत श्रेया म्हणाली, जोपर्यंत माझा आवाज आहे, तोपर्यंत मी माझी प्रॅक्टिस सुरू ठेवेन. स्टेजवर उभं राहून प्रेक्षकांसाठी लाईव्ह गाणं नेहमीच आवडेल"
advertisement
5/7
"काही आर्टिस्ट लिपसिंक करतात. त्यांची स्टाईल वेगळी आहे. पण मला त्याने खूप त्रास होता. ज्या दिवशी मला ते करावं लागेल त्यादिवशी मी गाणं बंद करेन", असं श्रेया एबीपीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.
advertisement
6/7
16 वर्षांची असताना श्रेयाने 'सा रे गा मा' हा सिंगिंग रिएलिटी शो जिंकला. चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्या आईने तिला टीव्हीवर पाहिलं. त्यानंतर भन्साळींनी तिला देवदास फिल्ममध्ये 'बैरी पिया' गाणं गाण्याची संधी दिली आणि इथूनच श्रेयाचं बॉलिवूड पदार्पण झालं. या गाण्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला.
advertisement
7/7
श्रेयाने तिच्या कारकिर्दीत आतापर्यंत 3000 हून अधिक गाणी गायली आहेत. तिने हिंदी, मराठी, बंगाली, भोजपुरी आणि कन्नड, तेलुगू, तामिळ, मल्याळम अशा दाक्षिणात्य भाषेतही गाणी गायली आहेत. तसंच तिने पंजाबी, इंग्रजी, आसामी, नेपाळी, तुळु, अंगिका, ओडिया, गुजराती, फ्रेंच आणि उर्दूमध्ये शेकडो गाणी देखील गायली आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shreya Ghoshal : अरिजीत सिंहनंतर श्रेया घोषालही गाणं सोडणार? म्हणाली, ' ...त्याचा मला खूप त्रास होतो'