Mobile Saving Hack : मोबाईल पाण्यात पडल्यावर लोक हमखास करतात 'ही' चूक! फोन वाचण्याची शक्यता होते कमी..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to save phone after it falls into water : मोबाईल पाण्यात पडल्यावर आपली तो वाचवण्यासाठी धडपड सुरु असते. मोबाईल तांदळामध्ये टाकणं, तो पुसणं या गोष्टी तर आपण करतोच. पण आपल्यापैकी बहुतांश लोक एक मोठी चूक करतात. ज्यामुळे नंतर मोबाईल दुरुस्त होण्याची शक्यता खूप कमी होते.
advertisement
1/7

तज्ज्ञांच्या मते, मोबईल पाण्यात पडल्यावर तो लगेच पाण्यातून बाहेर काढा. rd.com च्या वृत्तानुसार, तंत्रज्ञान तज्ञ क्रिस्टन कोस्टा म्हणतात की फोन जितका जास्त वेळ पाण्यात राहील तितका तो दुरुस्त होण्याची शक्यता कमी असते. तसेच एक चूक टाळा.
advertisement
2/7
सर्वात मोठी चूक लोक ही करतात की, पाण्यातून काढलेला मोबाईल दुरुस्त आहे की नाही हे पाहण्यासाठी तो लगेच सुरु करतात. मात्र नवभारतच्या वृत्तामध्ये तंत्रज्ञान तज्ञ आणि टेकबुलिशचे संस्थापक अनिर्बान साहा म्हणतात की, ओला फोन सुरु केल्याने त्याच्या अंतर्गत सर्किट्सना नुकसान होऊ शकते. म्हणून ही चूक टाळा.
advertisement
3/7
मोबाईल पाण्यातून काढल्याबरोबर त्याचे कव्हर, चार्जर किंवा हेडफोन्स अशा कोणत्याही अॅक्सेसरीज लागलेल्या असतील तर त्या काढून टाका. यामुळे फोनमध्ये पाणी शिरणार नाही.
advertisement
4/7
आता जवळपास सर्वांच्याच फोनमध्ये इनबिल्ट म्हणजेच न काढता येण्याऱ्या बॅटरी असतात. पण तुमच्या फोनमध्ये अशी काढता येणारी बॅटरी असेल तर सर्वात आधी बॅटरी आणि सिम कार्ड काढून टाका.
advertisement
5/7
मोबाईल पाण्यातून काढल्याबरोबर तो एखाद्या मऊ, लिंट-फ्री टॉवेलने साफ करा आणि शक्य तितका कोरडा करा. फोनच्या बाहेरीच्या भागासोबतच सिम आणि चार्जिंग पोर्टभोवतीचा भाग कोरडा करा.
advertisement
6/7
तज्ञांच्या मते, इमर्जन्सी ड्रायिंग किट प्रभावी असते. पण तुम्ही योग्य पद्धती फॉलो केल्या तर तुम्ही केवळ हवेमध्येही तुमचा फोन कोरडा करू शकता. फोनचे चार्जिंग पोर्ट खाली तोंड करून ठेवा. याचप्रकारे तुम्ही फोनच्या स्पीकरमधूनही पाणी काढू शकता.
advertisement
7/7
मोबाईल वेगाने सुकवण्यासाठी त्याला वारं लागणं गरजेचं आहे. म्हणून तुमचा फोन शक्यता तितका वेळ पंख्याजवळ ठेवा. याने फोन बऱ्यापैकी कोरडा होईल. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Mobile Saving Hack : मोबाईल पाण्यात पडल्यावर लोक हमखास करतात 'ही' चूक! फोन वाचण्याची शक्यता होते कमी..