TRENDING:

Activities For Kids : उन्हाळी सुट्ट्यात मुलांसोबत करा 'या' अ‍ॅक्टिव्हिटीज; होणार नाही बोअर, खेळताना शिकतील नव्या गोष्टी!

Last Updated:
Summer holiday activities for kids : उन्हाळा सुरु झाला की मुलांच्या सुट्ट्या येतात आणि मग त्यांची घरात मस्ती सुरु होते. मुलांना खार तर बाहेर खेळायचं असतं. पण बाहेर खूप ऊन असल्यामुळे आपण मुलांना बाहेर जाऊ देत नाही. मग घरात मुलांना गुंतवण्यासाठी आपण काही अ‍ॅक्टिव्हिटीज करू शकतो. पाहुयात त्या अ‍ॅक्टिव्हिटीज कोणत्या आहेत.
advertisement
1/7
उन्हाळी सुट्ट्यात मुलांसोबत करा 'या' अ‍ॅक्टिव्हिटीज; होणार नाही बोअर, खेळताना शिकतील नव्या गोष्टी!
मुलांना घरात गुंतवणं सोपं नसतं. मुलांना सतत काहीतरी वेगळं आणि ईंटरेस्टींग करायचं असतं. अशावेळी पालकांना मुलांना नेमकं कशात गुंतवावं हे काळात नाही तुमच्या या प्रॉब्लेमचं सोल्युशन इथे आहे. या लेखात दिलेल्या काही अ‍ॅक्टिव्हिटीज तुम्ही तुमलांना करायला लावू शकता.
advertisement
2/7
रूम डेकोरेट करणं : मुलांना तुम्ही फक्त त्यांची खोली आवरायला किंवा स्वच्छ करायला सांगाल तर ते कंटाळा करतील. मात्र तुम्ही जर त्यांना रम डेकोरेट करण्यासाठी प्रोत्साहन दिलं, तर मुलं आनंदाने खोली साफही करतील. मुलांना काही छोट्या छोट्या DIY वस्तू बनवायला शिकवा, ज्या मुलांना त्यांच्या रूममध्ये सजवता येतील. यात मुलं छान रमतात.
advertisement
3/7
फिटनेस चॅलेंज : मुलं बाहेर तर खेळतातच पण तरीही तुम्ही त्यांना घरातल्या घरात व्यायामासाठी प्रोत्साहन देऊ शकता. यासाठी मुलांना रोजचे 10-मिनिटांचे फिटनेस चॅलेंज द्या. मुलांना स्किपिंग, पुश-अप्स, सिट-अप्स किंवा इतर कोणतेही सोपे व्यायाम प्रकार करायला सांगा. सोबत मुलांचे आवडते म्युझिक लावा. यामुळे मुलांना आणखी उत्साह येईल.
advertisement
4/7
किचनमध्ये मदत : मुलांना तुम्ही किचनमध्येही मदत करायला संगी शकता. मुलांना लसूण निसने, कोथिंबीर निवडणे यापासून तर थोड्या मोठ्या मुलांना तुम्ही साधे साधे पदार्थही बनवायला शिकवू शकतात. उदाहरणार्थ तुम्ही मुलांना सँडविच बनवायला शिकवू शकता.
advertisement
5/7
आठवणींचा संग्रह : मुलांना ते रोज करत असलेल्या नव्या गोष्टी लिहायला प्रोत्साहन द्या. त्यांना त्यांच्या सुंदर आठवणींची एक वही बनवायला सांगा. यामुळे मुलांच्या आनंदी क्षणांचा एक छान संग्रह तयार होईल. पुढच्या सुट्टीत तुम्ही तो मुलांना दाखवू शकता. त्यांना मज्जा वाटेल.
advertisement
6/7
DIY प्रोजेक्ट्स : मुलांना DIY प्रोजेक्ट्स तयार करायला सांगा. जसे आता उन्हाळा आहे, तर उन्हाळ्यात बनणाऱ्या पेयांचे चित्र काढायला सांगा किंवा ती पेयं कागदाच्या साहाय्याने बनवायला सांगा. मुलं रंग भरणं, कागद चिकटवणं, नव्या वस्तू बनवणं एन्जॉय करतात.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Activities For Kids : उन्हाळी सुट्ट्यात मुलांसोबत करा 'या' अ‍ॅक्टिव्हिटीज; होणार नाही बोअर, खेळताना शिकतील नव्या गोष्टी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल