Sunil Gavaskar : गावस्कर पहिल्यांदाच इतके भडकले, अबरारला संघात घेतल्यावरून काव्यावर चिडले,'तुमच्या याच पैशातून ते जवानांना...'
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
काव्या मारनच्या या निर्णयावर आता टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सतंप्त प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
1/8

आयपीएलमधल्या सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. कारण तिन द हंड्रेड लीगमध्ये सनरायझर्स लीडससाठी पाकिस्तानच्या अबरार अहमदला 2.24 करोडच्या किमतीत ताफ्यात घेतलं आहे.
advertisement
2/8
खरं तर सनरायझर्स लीडसचा मालकी हक्क हा सन ग्रुपकडे आहे. आणि सन ग्रुप हा इंडियन प्रिमियर लीग मधील सनरायझर्स हैदराबादचा देखील मालक आहे.या दोन्ही संघाची जबाबदारी ही काव्या मारनच्या खांद्यावर आहे.त्यामुळे पाकिस्तानच्या अबरारला संघात घेतल्यामुळे तिच्यावर प्रचंड टीका होत.
advertisement
3/8
दरम्यान काव्या मारनच्या या निर्णयावर आता टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सतंप्त प्रतिक्रिया दिली आहे. सनरायझर्स लीडस संघाने पाकिस्तान स्पिनरला संघात घेतल्यामुळे तो वाद उफाळल आहे, तो साहजिक आहे. याचा अर्थ अशा निर्णयानंतर हे होणारच होतं.
advertisement
4/8
2008 मध्ये झालेल्या मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंवर आयपीएलमध्ये बंदी घालण्यात आली. त्यानंतर 2019 ला पुलवामा अटॅक आणि 2025 ला पहलगाम अटॅक या सगळ्या घटना पाहता अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येणे स्वाभाविक असल्याचे सुनील गावस्कर म्हणाले आहेत.
advertisement
5/8
जर एखादी भारतीय मालकीची टीम पाकिस्तानी खेळाडूला पैसै देते आहे. तर तो पैसा टॅक्सच्या रुपात पाकिस्तानच्या सरकारपर्यंत पोहोचतो, आणि याचा वापर ते शस्त्र खरेदी करण्यासाठी करतात, असे सुनील गावस्कर म्हणाले आहेत.याचा अर्थ पाकिस्तानी खेळाडूंना दिलेल्या गेलेल्या पैशांचा वापर हा भारतीयांचे खुन करण्यासाठी केला जातो.
advertisement
6/8
सनरायझर्स लीडसचे कोच डेनियल विटोरी यांना कदाचित ही गोष्ट समजू शकले नसतील.पण जे भारतीय मालक होते (काव्या मारन) याना ही गोष्ट लक्षात आली पाहिजे, असेही गावस्कर म्हणाले आहेत.
advertisement
7/8
जर मालक भारतीय आहे, तर तो अप्रत्यक्षपणे अशा सिस्टमला (पाकिस्तान सरकारला) पैसै देतो आहे, जो भारतीय सैनिक आणि नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरतो आहे.त्यामुळे ही एक टुर्नामेंट जिंकणे ही भारतीयांच्या जीवापेक्षा अधिक आहे का? असा सवालही सुनील गावस्कर यांनी विचारला आहे.
advertisement
8/8
दरम्यान अबरार अहमदला खरेदी केल्यानंतर सनरायझर्स लीडसच एक्स अकाउंट बंद करण्यात आलं होत. त्यानंतर टीका कमी झाल्यानंतर अकाऊंट पुन्हा सूरू झालं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Sunil Gavaskar : गावस्कर पहिल्यांदाच इतके भडकले, अबरारला संघात घेतल्यावरून काव्यावर चिडले,'तुमच्या याच पैशातून ते जवानांना...'