TRENDING:

संगीताशी घटस्फोटानंतर थलापती विजय करणार त्रिशा कृष्णनशी लग्न? अभिनेत्रीच्या आईनेच सगळं सांगितलं

Last Updated:
Thalapathy Vijay Trisha Krishnan : थलापती विजय आणि त्रिशा कृष्णन यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर होत असताना त्रिशाची आई उमा कृष्णनची त्यावरील प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
advertisement
1/7
संगीताशी घटस्फोटानंतर थलापती विजय करणार त्रिशाशी लग्न? अभिनेत्रीच्या आईनेच सगळं सांगितलं
साऊथ स्टार थलापती विजय आणि त्रिशा कृष्णन सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलेच चर्चेत आली आहे. थलापतीचे अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संंबंध असल्याचा आरोप करत त्याची पत्नी संगीता सोर्नालिंगमने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. ही अभिनेत्री त्रिशा असल्याची चर्चा आहे.
advertisement
2/7
घटस्फोटाच्या चर्चांदरम्यानही थलापती विजय आणि त्रिशा एकत्र दिसले.  थलापतीचा मुलगा जेसन संजयनेही त्याच्या नावातून वडिलांचं आडनाव काढून टाकलं आहे. आता थलापती आणि त्रिशा लग्न करत असल्याची चर्चा होते आहे आणि याबाबत आता अभिनेत्रीच्या आईनेही हिंट दिल्याचं सांगितलं जातं आहे.
advertisement
3/7
त्रिशाची आई उमा कृष्णन यांनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. तिला थलापती आणि त्रिशाचा चाहत्यांनी बनवलेला रील व्हिडिओ आवडला, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की विजय आणि त्रिशा लवकरच लग्नबंधनात अडकतील.
advertisement
4/7
विजय आणि त्रिशा लवकरच लग्न करू शकतात अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल व्हिडीओत असा दावा करण्यात आला की तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोघंही लग्न करतील.
advertisement
5/7
विजय आणि त्रिशाच्या लग्नासंबंधीच्या या पोस्टवर त्रिशाची आई उमा कृष्णनची रिएक्शन आली असून तिने ही पोस्ट लाइक केल्याचा दावा केला जातो आहे. त्यामुळे विजय-त्रिशाच्या लग्नाची अफवा म्हणा किंवा चर्चा पण याला अधिक बळकटी मिळाली आहे.
advertisement
6/7
दरम्यान काही युझर्सनी त्रिशाच्या आईची ही प्रतिक्रिया म्हणजे तिच्या मुलीसाठी आईचा आधार असू शकतो असं म्हटलं आहे. तर काही युझर्सनी हे चुकून लाइक झालं असावं असं म्हटलं आहे. तर अनेकजण असा उमा कृष्णन यांनी यापूर्वी विजय आणि त्रिशाच्या कथित नात्याचे संकेत देणाऱ्या अनेक पोस्ट आणि रील्स लाईक केल्याचा दावा केला आहे.
advertisement
7/7
एका नेटिझन्सने त्रिशाच्या आईने खरंच पोस्ट लाइक केली का हे सर्च केलं, पण लाइक केलेल्यांमध्ये तिचं नाव नाही असं निदर्शनास आणून दिलं. यावर त्रिशाच्या आईने ही पोस्ट लाइक केल्याचा दावा करणाऱ्या युझरने ती पोस्ट डिलीट केलं असं म्हटलं आहे. दरम्यान या सगळ्या दाव्यांचं समर्थन न्यूज18मराठी करत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
संगीताशी घटस्फोटानंतर थलापती विजय करणार त्रिशा कृष्णनशी लग्न? अभिनेत्रीच्या आईनेच सगळं सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल