TRENDING:

Weather Alert : वादळी वारे वाहणार अन् विजांचा कडकडाट होणार, महाराष्ट्रावर अवकाळी संकट, 8 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. 16 मार्चचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/7
वादळी वारे वाहणार अन् विजांचा कडकडाट होणार,  महाराष्ट्रावर अवकाळी संकट, 8 जिल्ह्यांना अलर्ट
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट चांगलीच वाढलेली पाहायला मिळत आहे. या लाटेतच राज्यावर अवकाळी पावसाचं नवं संकट घोंघावत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. 16 मार्चचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/7
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील. मुंबईत कमाल तापमान 32-36 अंश सेल्सियस तर किमान 24-27 अंश तापमान राहील. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवेल.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये कोरडे आणि उष्ण हवामान राहील. पुण्यात कमाल 33-36 अंश तर किमान 18-21 अंश तापमान राहील. 16 मार्चला सोलापूर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये तापमानात वाढ पाहायला मिळेल. नाशिकमध्ये दिवसा 32-35 अंश तर 19-22 अंश तापमान पाहायला मिळेल.
advertisement
5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, आणि नांदेडमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान पाहायला मिळेल. परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही भागात गारपिटीची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागेल. कमाल तापमान 34-38 अंशांवर राहील.
advertisement
6/7
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणामध्ये उष्ण हवामान कायम असेल. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होईल.
advertisement
7/7
एकंदरीत, 16 मार्चला महाराष्ट्रात उष्णता कायम राहील. तर काही भागात अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची तर शेतकऱ्यांना शेतीपिकांची योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : वादळी वारे वाहणार अन् विजांचा कडकडाट होणार, महाराष्ट्रावर अवकाळी संकट, 8 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल