हाऊसिंग सोसायटीत फ्लॅट,घर खरेदी करता पण त्याखालची जमीन तुमच्या मालकीची असते का? ९९% लोकांना माहीतच नाही
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Property Rules : तुम्हाला एक गोष्ट माहितीये का? तुमच्या फ्लॅट खालील जमीन कुणाच्या मालकीची असते? याचबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
1/5

<strong>मुंबई :</strong> आपण आयुष्यभर कष्ट करून नवीन फ्लॅट,घर खरेदी करत असतो. त्यासाठी EMI,TAX आणि मेंटेनन्स भरत असतो. पण तुम्हाला एक गोष्ट माहितीये का? तुमच्या फ्लॅट खालील जमीन कुणाच्या मालकीची असते? याचबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
2/5
बहुतांश सोसायटींमध्ये बिल्डिंगखालील जमीन ही बिल्डरच्या नावावर किंवा दुसऱ्या कुणा व्यक्तीच्या नावावर असते.परंतु जेव्हा बिल्डिंग रिडव्हलपमेंटला जाते.तेव्हा पहिला प्रश्न विचारला जातो तो म्हणजे जमीन कुणाची आहे? याच प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अत्यंत महत्वाचा बदल आणला आहे.
advertisement
3/5
<strong>व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय?</strong> राज्य सरकारकडून व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डचा पर्याय देण्यात आला आहे. हे व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड राज्यातील प्राथमिक भूमी अभिलेख दस्तऐवज असलेल्या ७/१२ उताऱ्याचा विस्तार म्हणून काम करते.
advertisement
4/5
त्यात इमारतीचे एकूण क्षेत्रफळ, प्रत्येक वैयक्तिक फ्लॅटचे कार्पेट एरिया आणि प्रत्येक फ्लॅट मालकाला दिलेल्या जमिनीचा नेमका वाटा यांचा तपशील असतो. मालमत्तेवर सुरक्षित केलेल्या कर्जाची आणि सामान्य क्षेत्रांच्या वाट्याची माहिती देखील समाविष्ट केली जाते.
advertisement
5/5
<strong>व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड नसल्यास काय धोका असतो?</strong> जमीन सोसायटीच्या नावावर नसेल तर रिडव्हलपमेंट प्रोसेसला अडचणी येऊ शकता.व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड असल्यास बिल्डरवर अवलंबून राहण्याची गरज पडत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
हाऊसिंग सोसायटीत फ्लॅट,घर खरेदी करता पण त्याखालची जमीन तुमच्या मालकीची असते का? ९९% लोकांना माहीतच नाही