हृदय पिळवटून टाकणारा प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहरातील वागळे इस्टेट येथील इंदिरानगरमध्ये राहत असलेल्या फिरोज खान (वय30) याच्यावर हा हल्ला झालेला आहे. सर्व गुन्हाची घटना 5 मार्चच्या रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली. पीडीत तरुण फिरोज खान आणि आरोपी या दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्या वादातून आरोपी प्रथम रेडीज आणि त्याच्या दुसऱ्या साथीदाराने फिरोजच्या डोक्यावर दगडाने मारहाण केली. ज्यात फिरोज गंभीर जखमी झाला.
advertisement
भरवस्तीत झालेल्या या हल्ल्यानंतर स्थानिकांनी फिरोजला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखले. सध्या फिरोजवप उपचार सुरु असून फिरोजचा लहान भावाने लगेच जाऊन श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली. श्रीनगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
