TRENDING:

रस्त्यावरचं ‘ते’ पोस्टर पाहिलं, लेकासाठी आईनं मंगळसूत्र विकलं; मराठमोळा विक्रम भारताचा फिटनेस ब्रँड अम्बॅसिडर, Video

Last Updated:

Inspiring Story: मराठमोळ्या विक्रम जाधवच्या कामगिरीची दखल घेत भारत सरकारने विक्रम जाधव यांची देशाचा फिटनेस ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
‎छत्रपती संभाजीनगर : आईने स्वतःचे मंगळसूत्र विकून मुलाच्या स्वप्नांना पंख दिले आणि त्या स्वप्नांच्या जोरावर मुलाने देशपातळीवर आपली ओळख निर्माण केली. छत्रपती संभाजीनगरच्या 29 वर्षीय विक्रम जाधवची ही कहाणी आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही विक्रमच्या फिटनेसच्या स्वप्नासाठी त्याच्या आईने मोठा त्याग केला.
advertisement

विक्रमच्या आईने लेकासाठी मंगळसूत्र विकून ट्रेनिंग आणि आहाराचा खर्च भागवला. आईच्या त्या त्यागाची जाणीव ठेवत विक्रमने दिवस-रात्र मेहनत केली आणि फिटनेस क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्याच्या कामगिरीची दखल घेत भारत सरकारने विक्रम जाधव यांची देशाचा फिटनेस ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड केली आहे.

Success Story : ‘ती’ परिस्थितीवर रडली नाही, लढली! वृत्तपत्र विक्रेत्याची लेक बनली सीए

advertisement

विक्रम जाधव हा छ. संभाजीनगर जिल्ह्यातील कचनेर या ठिकाणचा आहे. त्याने बीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. विक्रमचे वडील दररोज जिम करायचे. ते बॉडी बिल्डर असल्याने त्यांना बघून विक्रमला देखील बॉडी बनवण्याची इच्छा झाली. तसेच दररोज शाळेत जाताना अंबुजा सिमेंटचं एक पोस्टर दिसायचं. त्यावर मजबूत असा एका व्यक्तीचा फोटो दिसायचा. आपण देखील अशीच बॉडी बनवावी असं वाटू लागल्याचं विक्रम सांगतो.

advertisement

View More

दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर अकरावीचं कॉलेज आणि जिम सोबतच सुरू झाली. जिमला गेल्यानंतर यामध्ये देखील वेगवेगळ्या स्पर्धा असतात, ही बाब त्याला माहिती झाली. तो अशा स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागला. सुरुवातीला  मराठवाडा पातळीवर तो भाग घेत होता. त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धा गाजवल्या. ‘मिस्टर महाराष्ट्र’ झाल्यानंतर त्याला ‘मिस्टर इंडिया’ बद्दल माहिती मिळाली. त्याने या देखील स्पर्धेत भाग घेतला आणि 2019 मध्ये तो ‘मिस्टर इंडिया’ झाला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रस्त्यावरचं ‘ते’ पोस्टर पाहिलं, लेकासाठी आईनं मंगळसूत्र विकलं; मराठमोळा विक्रम भारताचा फिटनेस ब्रँड अम्बॅसिडर, Video
सर्व पहा

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फिटनेस कॅमची सुरुवात केली होती. तर 2026 साली त्याची भारताचा फिटनेस ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड झालेली आहे. अत्यंत हलातीच्या परिस्थितीमधून विक्रम इथपर्यंत पोहोचलेला आहे. त्याची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
रस्त्यावरचं ‘ते’ पोस्टर पाहिलं, लेकासाठी आईनं मंगळसूत्र विकलं; मराठमोळा विक्रम भारताचा फिटनेस ब्रँड अम्बॅसिडर, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल