'कुणासोबत झोपावं लागलं तरी झोपेन', Bigg Boss फेम इन्फ्लुएंसरचं वादग्रस्त वक्तव्य
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss : बिग बॉस फेम ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर वैयक्तिक कारणामुळे आधीच चर्चेत होती. आता तिच्या या नव्या वक्तव्यामुळे ती पुन्हा वादात अडकली आहे.
advertisement
1/7

बिग बॉसच्या घरात तुम्ही कित्येक सदस्यांना भांडताना, वादग्रस्त विधानं करताना पाहिलं असेल. अशीच एक बिग बॉस फेम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जी असं काही बोलली आहे, ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
2/7
एका पॉडकास्टला या इन्फ्लुएन्सरने मुलाखत दिली. त्यातील तिचा एक छोटा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामुळे ती वादात सापडली आणि ट्रोल होऊ लागली आहे.
advertisement
3/7
ही इन्फ्लुएन्सर म्हणाली, मला काही लाज वाटणार नाही. एक आई असण्याच्या नात्याने खूप मोठी गोष्ट बोलते आहे. लोक मला कसे जज करतील माहिती नाही पुढे ती सांगते, मला माझं मूल सांभाळण्यासाठी कुणासोबत झोपावं लागलं तरी मी ते करेन, पोसेन', असं म्हणत ती इमोशनल होते, रडू लागते.
advertisement
4/7
या इन्फ्लुएन्सरचं लग्न झालं आहे आणि तिला एक मुलगाही आहे. सध्या ती वैवाहिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. चंद्रिकाने तिच्या नवऱ्यावर फसवणुकीचा आरोप लावला आहे, त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचं तिने म्हटलं. त्यामुळे त्यांचं नातं काही चांगलं नाही ते तुटण्याच्या मार्गावर आहे.
advertisement
5/7
याचदरम्यान तिचा एका मिस्ट्री मॅनसोबत लग्न केल्याचे फोटो व्हायरल झाले. नवऱ्याला घटस्फोट न देता, तिने लग्न केल्याच्या चर्चा रंगू लागल्या. पण असं काही नसल्याचं तिने स्पष्ट केलं. आणि आता तिने आपल्या मुलाच्या संगोपनासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असल्याचं सांगितलं. तिच्या या वक्तव्यामुळे ती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
advertisement
6/7
ही इन्फ्लुएन्सर आहे, चंद्रिका दीक्षित. जी एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. दिल्लीत तिचा वडा पाव स्टॉल आहे. तिला खरी ओळख वडा पाव स्टॉलमुळे मिळाली. वडा पाव गर्ल म्हणून ती रातोरात फेमस झाली. यानंतर तिला बिग बॉस ओटीटी 3 या रिअॅलिटी शोमध्ये येण्याची संधी मिळाली.
advertisement
7/7
इतकी मेहनती मुलगी, त्यामुळे तिनं पॉडकास्टमध्ये केलेलं असं विधान ऐकून लोक शॉक झाले आहेत. काहींनी तिला ट्रोल केलं आहे. काहींनी या सर्व प्रकाराला नौटंकी असं म्हटलं आहे. तर काहींनी हा मार्ग स्वीकारण्यापेक्षा कठोर परिश्रम करण्याचा सल्ला दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'कुणासोबत झोपावं लागलं तरी झोपेन', Bigg Boss फेम इन्फ्लुएंसरचं वादग्रस्त वक्तव्य