TRENDING:

PAK vs BAN : 'मला वाटलं तो धावतोय म्हणून मी...', सलमान आगाच्या वादग्रस्त रनआऊटवर मेहदी हसनने सोडलं मौन

Last Updated:
दरम्यान या सर्व प्रकरणावर आता बांग्लादेशचा कॅप्टन मेहदी हसनने मौन सौडलं आहे "तुम्हालाही जबाबदारी घ्यावी लागेल कारण जर तुम्हाला धावा मिळत नसतील तर निश्चितच आपण चांगल्या स्थितीत नाही आहोत.
advertisement
1/7
'मला वाटलं तो धावतोय म्हणून मी...', सलमान आगाच्या वादग्रस्त रनआऊटवर मेहदी हसनने सोडलं मौन
ढाकाच्या शेरे बांगला नेशनल स्टेडिअमवर शुक्रवारी पार पडलेल्या सामन्यात पाकिस्तानने डिएलएस मेथडनूसार बांग्लादेशने 128 धावांनी पराभव केला होता.
advertisement
2/7
या सामन्यात पाकिस्तानी खेळाडू सलमान आगाच्या वादग्रस्त रनआऊटवरून प्रचंड वाद झाला होता. हा वाद शमता शमत नाही आहे.
advertisement
3/7
खरं तर ही घटना 38 व्या ओव्हरला घडली आहे. ही ओव्हर बांगलादेशचा कॅप्टन मेहदी हसन टाकायला आला होता.मेहदी हसनच्या या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर मोहम्मद रिजवानने नुसता बॉल प्लेस केला होता.
advertisement
4/7
दरम्यान हा बॉल सलमान आगाच्या बाजूला थांबताच त्याने तो उचलून मेहंदी हसनच्या हातात देण्याचा प्रयत्न केला. पण इतक्यात मेहंदी हसनने बॉल हिसकावून त्याला रनआऊट केले.
advertisement
5/7
या रनआऊटनंतर सलमान आगा प्रचंड चिडला होता.त्याने अंपायरने आऊट देताच मैदानात हेल्मेट काढून मैदानात आपटलं होतं, आणि त्यासोबत आपले ग्लोव्हज देखील फेकून दिले होते.
advertisement
6/7
या घटनेनंतर आता सलमान आघावर आयसीसीने मोठी कारवाई केली आहे. सामनाधिकारी नियामूर रशीद यांनी हा गुन्हा लेव्हल 1 चा आणि खेळाडू आणि खेळाडूंच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.२ चे उल्लंघन असल्याचे मानले. नंतरचा गुन्हा 'आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान क्रिकेट उपकरणे किंवा कपडे, मैदानी उपकरणे किंवा फिक्स्चर आणि फिटिंग्जचा गैरवापर' याशी संबंधित आहे.
advertisement
7/7
आघा धावबाद झाल्यावर, तो विकेटपासून दूर होता आणि मी बॉल शोधत होतो. पण त्याने ते चुकवले तर निश्चितच तो धावण्यासाठी जात होता, म्हणून मी तेच विचार करत त्याला रनआऊट केले असे महंदी म्हणाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
PAK vs BAN : 'मला वाटलं तो धावतोय म्हणून मी...', सलमान आगाच्या वादग्रस्त रनआऊटवर मेहदी हसनने सोडलं मौन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल