TRENDING:

धर्मेंद्रजींचा लाडका, दारूच्या नशेने झाला बरबाद! 'हीमॅन'ने लगावलेली सणसणीत कानशिलात, 50 व्या वर्षीही अविवाहित आहे अभिनेता

Last Updated:
Guess Who: गुंडांच्या अंगावर धावून जाणारे धर्मेंद्र असो ढाई किलोच्या हाताने शत्रूला सळो की पळो करून सोडणारा सनी असो किंवा मग आपल्या चार्मने चाहतींना घायाळ करणाका बॉबी असो, प्रत्येकाने आपला काळ गाजवला. पण याच घरात असा एक हिरो आहे, ज्याला त्याच्या भावांप्रमाणे पडद्यावर वेगळी कमाल करून दाखवता आली नाही.
advertisement
1/8
धर्मेंद्रजींचा लाडका, दारूच्या नशेने झाला बरबाद! 'हीमॅन'ने लगावलेली सणसणीत कानशिलात
बॉलिवूडमधील दमदार घराण्यांपैकी एक घराणं म्हणजे देओल कुटुंब. या कुटुंबातील प्रत्येक हिरोने स्क्रीनवर एक वेगळीच कमाल करून दाखवली आहे. गुंडांच्या अंगावर धावून जाणारे धर्मेंद्र असो ढाई किलोच्या हाताने शत्रूला सळो की पळो करून सोडणारा सनी असो किंवा मग आपल्या चार्मने चाहतींना घायाळ करणाका बॉबी असो, प्रत्येकाने आपला काळ गाजवला. पण याच घरात असा एक हिरो आहे, ज्याला त्याच्या भावांप्रमाणे पडद्यावर वेगळी कमाल करून दाखवता आली नाही.
advertisement
2/8
हा अभिनेता दुसरा कोणी नसून अभय देओल आहे. या हिरोने मास सिनेमांऐवजी क्लास सिनेमांना प्राधान्य दिले. पण अभिनयाच्या बाबतीत त्याने आपल्या चुलत भावांना तगडी टक्कर दिली. बॉक्स ऑफिसवर त्याला खास कामगिरी करता आली नसली, तरीही सामाजिक विषयांवर आधारित त्याच्या सिनेंमांनी समीक्षकांची मनं जिंकली.
advertisement
3/8
सध्याच्या घडीला अभय देओल अतिशय शांत अभिनेता वाटत असला, तरीही त्याच्या बालपणी तो प्रचंड खोडकर होता. एका मुलाखतीत त्याने स्वतः सांगितलं होतं की, त्याच्या खोड्यांमुळे लहानपणी त्याने घरच्यांचा खूप मारही खाल्ला आहे.
advertisement
4/8
अभयला गाडी वेगाने चालवण्याची खूप आवड होती. एकदा असाच तो सुसाट वेगाने गाडी चालवत असताना थोरले काका म्हणजेच धर्मेंद्र यांनी त्याला रंगेहात पकडले आणि अतिवेगाने गाडी चालवल्यामुळे भर रस्त्यात एक सणसणीत थप्पड लगावली होती.
advertisement
5/8
अनुराग कश्यपच्या देव डी ही फिल्म अभय देओलच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरला. मात्र, या सिनेमामध्ये त्याने एका व्यसनी प्रियकराची भूमिका इतक्या प्रभावीपणे साकारली की, खऱ्या आयुष्यातही त्याला यातून बाहेर पडता आले नाही. असंही सांगितलं जातं की, या भूमिकेच्या प्रभावामुळे जवळपास एक वर्ष सतत दारूच्या नशेत असायचा. या परिस्थितीतून त्याला बाहेर पडण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले, पण त्याने या व्यसनावर जिद्दीने मात केली.
advertisement
6/8
'सोचा ना था' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभयने त्याच्या कारकि‍र्दीत 'ओये लकी! लकी ओये!', 'मनोरमा सिक्स फीट अंडर' आणि 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' यांसारखे उत्तम फिल्म्स केल्या. त्याच्या फिल्म्सना १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करता आला नसला, तरीही बिझनेसमध्ये त्याने तुफान यश मिळवलं.
advertisement
7/8
अभिनयासोबतच अभयने रिअल इस्टेट, स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आणि अनेक रेस्टॉरंट्सच्या माध्यमातून ४०० कोटींचे साम्राज्य उभे केले आहे. त्याने न्यूयॉर्कमधून आर्ट आणि थिएटरचं सखोल शिक्षण घेतलं आहे, जे त्याच्या अभिनयात स्पष्टपणे जाणवतं.
advertisement
8/8
आज १५ मार्च २०२६ रोजी अभय देओलने वयाची पन्नाशी गाठली आहे. सनी आणि बॉबी देओल यांची मुलं आता लग्नाच्या बेडीत अडकत असताना, अभय मात्र आजही सिंगल आहे. त्याने अद्याप लग्न केलेलं नाही आणि आपल्या अटींवर तो आयुष्य जगत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
धर्मेंद्रजींचा लाडका, दारूच्या नशेने झाला बरबाद! 'हीमॅन'ने लगावलेली सणसणीत कानशिलात, 50 व्या वर्षीही अविवाहित आहे अभिनेता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल