Anushka Shetty : रश्मिकानंतर अनुष्का शेट्टीही करतेय लग्न, पण प्रभाससोबत नाही; मग कोण आहे होणारा नवरा?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Anushka Shetty Marriage : रश्मिका मंदानाच्या लग्नानंतर अनुष्का शेट्टीच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. तिचं नाव प्रभासशी जोडलं गेलं, पण होणारा नवरा वेगळाच असल्याची चर्चा आहे.
advertisement
1/7

अभिनेत्री रश्मिका मंदानानंतर आता अभिनेत्री अनुष्का शेट्टीही लग्न करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगते आहे. 44 वर्षांची अनुष्का शेट्टी लवकरच लग्न करणार आहे, अशी चर्चा आहे.
advertisement
2/7
बाहुबली फिल्ममधील देवसेना म्हणजे अनुष्का जिचं नाव बाहुबली म्हणजे प्रभासशी जोडलं गेलं. बाहुबली फिल्ममधील त्यांची जोडी अनेकांच्या पसंतीस पडली. रिलची ही जोडी रिअलमध्येही व्हावी असं त्यांच्या चाहत्यांना वाटतं.
advertisement
3/7
अनुष्का आणि प्रभास नेहमीच त्यांच्या लग्नाच्या आणि डेटिंगच्या अफवांमुळे चर्चेत असते. पण दोघांनीही आपण एकमेकांचं चांगले मित्र असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान आता अनुष्काच्या लग्नाची चर्चा होते आहे पण तिचा होणारा नवरा प्रभास नाही असं सांगितलं जातं आहे.
advertisement
4/7
प्रभास नाही मग अनुष्काचा नवरा कोण आहे, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. सोशल मीडिया आणि मीडिया रिपोर्टनुसार अनुष्काच्या कुटुंबाने तिचं लग्न ठरवलं आहे. तिचं लव्ह नाही तर अरेंज मॅरेज असल्याचं सांगितलं जातं आहे.
advertisement
5/7
अनुष्काचा होणारा नवरा प्रभास नाही, पण तो सिनेसृष्टीतीलही नाही. तर तो बंगळुरूमधील एक बिझनसमन असल्याची माहिती आहे. तो अनुष्काच्या कुटुंबाचा फॅमिली फ्रेंड आहे.
advertisement
6/7
या वर्षाच्या अखेरीस लग्न होण्याची शक्यता व्यक्त केल जाते आहे. लग्नाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. दरम्यान अनुष्काने अद्याप तिच्या लग्नाच्या बातमीला दुजोरा दिलेला नाही. तिच्याकडून कोणतंही अधिकृत विधान आलेलं नाही.
advertisement
7/7
अनुष्काच्या करिअरबाबत म्हणायचं तर 2025 साली ती 'घाटी' फिल्ममध्ये दिसली. त्याआधी ती 'मिस शेट्टी, मिस्टर पॉलिशेट्टी' मध्ये दिसली होती. तिने अनेक दक्षिण भारतीय ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. प्रभाससोबत 'बाहुबली' मध्ये देवसेना या भूमिकेसाठी तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Anushka Shetty : रश्मिकानंतर अनुष्का शेट्टीही करतेय लग्न, पण प्रभाससोबत नाही; मग कोण आहे होणारा नवरा?