TRENDING:

आयुष्यात पाहिलं नसेल असं Maternity Photoshoot! बिग बॉस फेम इन्फ्लूएन्सरच्या बायकोने चक्क सवतीसोबत काढले फोटो

Last Updated:
Payal Malik Maternity Photoshoot: सोशल मीडियाच्या दुनियेत लोकप्रिय असणारं मलिक कुटुंब लवकरच त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं स्वागत करणार आहे.
advertisement
1/11
बिग बॉस फेम इन्फ्लूएन्सरच्या बायकोचं सवतीसोबतच Maternity Photoshoot!
सोशल मीडियाच्या दुनियेत लोकप्रिय असणारं मलिक कुटुंब लवकरच त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं स्वागत करणार आहे.
advertisement
2/11
अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नी पायल आणि कृतिका बिग बॉस ओटीटीमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. यानंतर संपूर्ण देशात या कुटुंबाची चर्चा सुरू झाली.
advertisement
3/11
अरमानची पहिली पत्नी पायल आठ महिन्यांची गरोदर असून नुकतंच त्यांनी खास मॅटर्निटी शूट केलं आहे. तीन मुलांची आई असणाऱ्या पायलने आता आपल्या चौथ्या बाळाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केल्याचं यावेळी पाहायला मिळालं.
advertisement
4/11
दरम्यान तिच्या मॅटर्निटी शूटमधील फोटोंनी सध्या इंटरनेटवर आग लावली आहे. पायलने तिच्या या शूटसाठी एकापेक्षा एक जबरदस्त लूक्स केले आहेत.
advertisement
5/11
एका फोटोमध्ये ती लाल रंगाच्या गाऊनमध्ये असून पती अरमानने तिच्यासोबत ट्विनिंग केलं आहे. दोघेही यावेळी खूप खूश दिसत आहेत.
advertisement
6/11
अरमानच्या मांडीवर बसून पायलने दिलेली पोज सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून, त्यांच्यातील केमिस्ट्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
advertisement
7/11
ब्राऊन रंगाच्या पँट सूटमध्ये तिने बिनधास्तपणे तिचा बेबी बंप फ्लॉन्ट केला असून यावेळी तिचा आत्मविश्वास वाखाणण्यासारखा आहे. पण सगळ्यांचं लक्ष वेधलं ते पायल आणि कृतिकाच्या एकत्र फोटोंनी!
advertisement
8/11
पायल आणि अरमानसोबत त्याची दुसरी पत्नी कृतिकाही दिसून आली. तिघांनीही आनंदाने एकत्र फोटोशूट केलं आहे. यावेळी अरमानच्या दोन्ही बायकांमधील प्रेम पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
advertisement
9/11
एका फोटोत कृतिका मोठ्या उत्साहाने पायलच्या बेबी बंपवर कान लावून बाळाची हालचाल ऐकण्याचा प्रयत्न करताना दिसतेय.
advertisement
10/11
अरमान मलिक याच्यासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. तो पाचव्यांदा बाबा बनणार आहे. पहिली पत्नी पायलपासून त्याला आधीच तीन मुले आहेत. दुसरी पत्नी कृतिकापासून त्याला एक मुलगा आहे.
advertisement
11/11
आता पायल चौथ्या बाळाला जन्म देणार असल्यामुळे अरमान आता पाच मुलांचा बाप होणार आहे. मलिक कुटुंबात सध्या सणासारखे वातावरण असून, चाहत्यांनीही या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आयुष्यात पाहिलं नसेल असं Maternity Photoshoot! बिग बॉस फेम इन्फ्लूएन्सरच्या बायकोने चक्क सवतीसोबत काढले फोटो
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल