TRENDING:

नवाब घराण्याची लेक, अभिनयासाठी सोडली बँकेची नोकरी अन् पहिल्याच सिनेमाने दाखवला बाहेरचा रस्ता

Last Updated:
असे म्हटले जाते की स्टार किड्सना चित्रपटांमध्ये काम मिळणे सोपे जाते. चित्रपट पार्श्वभूमी असल्याने, त्यांचे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांशी संबंध असतात, ज्यामुळे ते भूमिका लवकर मिळवतात.
advertisement
1/7
नवाब घराण्याची लेक, अभिनयासाठी सोडली बँकेची नोकरी, पहिल्याच सिनेमातून हाकललं
बॉलीवूडमध्ये स्टार किड्सना सहज ब्रेक मिळतो असे अनेकदा म्हटलं जातं. स्टार किड्सना चित्रपटांमध्ये काम मिळणे सोपे जाते. चित्रपट पार्श्वभूमी असल्याने, त्यांचे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांशी संबंध असतात, ज्यामुळे ते भूमिका लवकर मिळवतात. पण तुम्हाला त्या अभिनेत्रीबद्दल माहिती आहे का जिने श्रीमंत आणि चित्रपट-केंद्रित कुटुंबातून असूनही शाहरुखसोबतची भूमिका गमावली.
advertisement
2/7
आपण बोलत असलेली ही अभिनेत्री आहे पतौडी घराण्याची लेक सोहा अली खान. सोहा अभिनयात येण्यापूर्वी लंडनमध्ये सिटी बँकेत नोकरी करत होती. ती तिथेच स्थायिक होण्याचा विचार करत होती. पण चित्रपट ऑफर मिळाल्यानंतर तिने बँकेची नोकरी सोडली.
advertisement
3/7
सोहाला अमोल पालेकर दिग्दर्शित "पहेली" चित्रपटासाठी ऑफर मिळाली होती. या चित्रपटात शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळणार असल्याने ती खूप उत्साहित होती. अमोल पालेकर यांनी तिला स्क्रिप्ट सांगितल्यानंतर तिने लगेच होकार दिला आणि नोकरी सोडली.
advertisement
4/7
सोहाच्या मते, एका दिवशी अमोल पालेकर यांनी तिला फोन करून सांगितले की शाहरुख खान या चित्रपटात हिरो असेल. सुरुवातीला सोहा खुश झाली, पण लगेचच अमोलजींनी स्पष्ट केले की "शाहरुख आला म्हणजे तू यात राहणार नाहीस." तिच्या भूमिकेत मग राणी मुखर्जीची निवड झाली.
advertisement
5/7
हा धक्का सोहासाठी मोठा होता. कारण एका बाजूला चित्रपट हातातून गेला आणि दुसऱ्या बाजूला तिने आधीच आपली बँकेची नोकरी सोडली होती. त्यामुळे तिचे करिअर त्या क्षणी थोडे अडकले.
advertisement
6/7
जरी "पहेली"तून तिने पदार्पण गमावले, तरी सोहाने नंतर "दिल मांगे मोर" (2004) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर "रंग दे बसंती", "खोया खोया चांद", "तुम मिले" असे चित्रपट करत ती ओळखली जाऊ लागली.
advertisement
7/7
तिने हिंदीसोबतच इंग्रजी आणि बंगाली चित्रपटांमध्येही काम केले. चित्रपटांमध्ये विशेष यश न मिळालं तरी सोहाने स्वतःचा वेगळा मार्ग निवडला. तिने 2015 मध्ये अभिनेता कुणाल खेमूसोबत लग्न केले आणि आज ती मुलगी इनाया नौमी खेमूची आई आहे. नुकतंच तिने तिचं पॉडकास्ट चॅनेलही सुरु केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
नवाब घराण्याची लेक, अभिनयासाठी सोडली बँकेची नोकरी अन् पहिल्याच सिनेमाने दाखवला बाहेरचा रस्ता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल