Stree 2 BO Collection : 100 कोटींपार पोहचला श्रद्धाचा स्त्री 2! तिसऱ्या दिवशी केली तुफान कमाई
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा स्त्री 2 हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय. सिनेमानं तीन दिवसांतचं बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मोठा पल्ला गाठला आहे.
advertisement
1/8

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा स्त्री 2 हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय. सिनेमानं तीन दिवसांतचं बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मोठा पल्ला गाठला आहे.
advertisement
2/8
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाने शनिवारीही बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. विक्रमी ओपनिंग करणाऱ्या 'स्त्री 2' ने दुसऱ्या दिवशीही प्रचंड नफा कमावला.
advertisement
3/8
श्रद्धा कपूर, राजकुमार, पंकज त्रिपाठी, अभिषेक बनर्जी, अपारशक्ति खुराना आणि तमन्ना भाटिया अशी तगडी स्टारकास्ट असलेला स्त्री 2 हा सिनेमा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
advertisement
4/8
शनिवारीही चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाची जादू पाहायला मिळाली. स्त्री 2 ने तिसऱ्या दिवशी किती कोटी रुपये छापले ते पाहूया.
advertisement
5/8
सैकनिल्क च्या रिपोर्टनुसार, श्रद्धा आणि राजकुमारच्या या हॉरर कॉमेडी चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी रात्री 10 वाजेपर्यंत 46 कोटींची कमाई केली आहे.
advertisement
6/8
यासोबत 'स्त्री 2'चे एकूण कलेक्शन आता 137.70 कोटींवर पोहोचलं आहे. या चित्रपटानं तिसऱ्या दिवशीच बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा गाठला आहे.
advertisement
7/8
हॉरर कॉमेडी असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. सिनेमानं पठाण, जवान सारख्या सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत.
advertisement
8/8
15 ऑगस्टला स्त्री 2 सोबत अक्षय कुमार चा'खेल-खेल में' आणि जॉन अब्राहमचा 'वेदा' चित्रपटही प्रदर्शित झाला. पण श्रद्धाचा चित्रपट आणि अक्षय-जॉनच्या चित्रपटांच्या कलेक्शनमध्ये खूप फरक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Stree 2 BO Collection : 100 कोटींपार पोहचला श्रद्धाचा स्त्री 2! तिसऱ्या दिवशी केली तुफान कमाई