TRENDING:

एकेकाळी 500 रुपये कमावणं कठीण अन् आज एका एपिसोडसाठी 25 लाख घेतो 'हा' अभिनेता; किती आहे संपत्ती?

Last Updated:
आपल्या विनोदानं प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता म्हणजे सुनील ग्रोव्हर. सुनीलला 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' मधून घराघरात ओळख मिळाली. सुनील आज आपला 47 वा वाढदिवस साजरा करणार आहे. हरियाणातील छोट्याशा गावात जन्मलेला सुनील आज कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे. जाणून घेऊया त्याचा प्रवास.
advertisement
1/9
एका एपिसोडसाठी 25 लाख घेतो 'हा' अभिनेता; किती आहे संपत्ती?
प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन सुनील ग्रोव्हरला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्यानं छोट्या पडद्यावर कॉमेडीसहित मोठ्या पडद्यावर आपल्या सिरीयस अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
advertisement
2/9
आपल्या उत्कृष्ट कॉमेडी आणि दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला सुनील ग्रोव्हर 47 वर्षांचा झाला आहे. त्याचा जन्म 3 ऑगस्ट 1977 रोजी हरियाणातील सिरसा जिल्ह्यातील मंडी डबवली येथे झाला होता.
advertisement
3/9
सुनील ग्रोव्हर अभिनेता होण्यासाठी मुंबईत आला होता. ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, 'थिएटरमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी अभिनयासाठी मुंबईत आलो. पण पहिलं वर्ष मी फक्त पार्ट्या करायचो. माझी बचत आणि घरातील काही पैसे घेऊन मी अतिशय पॉश भागात राहायचो.'
advertisement
4/9
ETimes ला दिलेल्या मुलाखतीत सुनील म्हणाला होता की, 'मला एका शोमध्ये तीन दिवस काम करायला लावून रातोरात बदलण्यात आलं आणि मला माहितीही दिली गेली नाही. मला नंतर दुसऱ्याकडून कळालं आणि खूप वाईट वाटलं.'
advertisement
5/9
प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमधून सुनील ग्रोव्हरला विशेष ओळख मिळाली. कपिलच्या शोमध्ये सुनील कधी गुत्थी बनला, कधी रिंकू भाभी तर कधी डॉ. मशूर गुलाटी बनला आणि प्रेक्षकांना खळखळून हसवलं.
advertisement
6/9
कपिलच्या शोमधील त्याच्या शानदार कॉमेडीमुळे तो 'कॉमेडी किंग' बनला. पण यासोबत त्यानं अनेक चित्रपट आणि वेब सिरीजमध्येही काम करत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.
advertisement
7/9
सुनील एकेकाळी बेरोजगार होता. त्याला 500 रुपयेही मिळत नव्हते. पण आता तो लक्झरी लाइफ जगतोय.
advertisement
8/9
तो मुंबईत एका आलिशान घरात राहतो जे त्यानं 2013 मध्ये 3 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. सुनील नुकताच 'द ग्रेट इंडियन कपिल' शोमध्ये दिसला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने एका एपिसोडसाठी 25 लाख रुपये घेतले होते.
advertisement
9/9
इंडिया टाईम्सच्या वृत्तानुसार, सुनील ग्रोव्हरची एकूण संपत्ती 21 कोटी रुपये आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
एकेकाळी 500 रुपये कमावणं कठीण अन् आज एका एपिसोडसाठी 25 लाख घेतो 'हा' अभिनेता; किती आहे संपत्ती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल