Sarla Maheshwari: कोण होत्या सरला महेश्वरी, ज्यांनी पाहिला B/W ते कलर टीव्हीपर्यंतचा प्रवास? शाहरुख खानशी खास कनेक्शन
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Sarla Maheshwari Death: भारतीय मनोरंजन विश्वातच्या सुवर्णकाळातील एक अत्यंत ओळखीचा चेहरा आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. दूरदर्शनच्या सुवर्णयुगातील दिग्गज वृत्त निवेदिका सरला माहेश्वरी यांनी आज दिल्लीत अखेरचा श्वास घेतला.
advertisement
1/8

भारतीय मनोरंजन विश्वात एक काळ असाही होता, जेव्हा असंख्य चॅनल्स आणि त्यावरील मालिकांमध्ये टीआरपीची स्पर्धा नसायची. डीडी नॅशनलची लक्षवेधी धून सुरू झाली, की परिसरात शांतता पसरायची. ज्यांच्या घरी टीव्ही आहे, त्यांच्याकडे आजूबाजूचे लोक गर्दी करायचे.
advertisement
2/8
त्याच सुवर्णकाळातील एक अत्यंत ओळखीचा चेहरा आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. दूरदर्शनच्या सुवर्णयुगातील दिग्गज वृत्त निवेदिका सरला माहेश्वरी यांनी आज दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे केवळ पत्रकारिता क्षेत्रच नाही, तर ८० आणि ९० च्या दशकात लहानाचे मोठे झालेले लाखो प्रेक्षक भावूक झाले आहेत.
advertisement
3/8
सरला माहेश्वरी म्हणजे केवळ एक निवेदिका नव्हत्या, तर त्या भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासाच्या साक्षीदार होत्या. १९७६ मध्ये त्यांनी दूरदर्शनमध्ये पाऊल ठेवलं आणि २००५ पर्यंत, म्हणजे तब्बल तीन दशकं त्यांनी बातम्यांच्या माध्यमातून देशाला माहिती दिली.
advertisement
4/8
जेव्हा टीव्हीवर बातम्यांचे प्रसारण दिवसातून फक्त काही तास असायचं, तेव्हा सरला यांचा तो स्थिर आणि आश्वासक आवाज घराघरात पोहोचायचा. ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा काळ ते रंगीत टीव्हीचं आगमन, या सर्व बदलांमध्ये सरला माहेश्वरी हे नाव आवर्जून घेतलं जातं.
advertisement
5/8
सरला माहेश्वरी यांचं व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होतं. दिल्ली विद्यापीठातून पीएचडी केल्यानंतर त्यांनी केवळ पत्रकारितेतच नव्हे, तर शिक्षण क्षेत्रातही आपली मुद्रा उमटवली. विशेष म्हणजे, त्या दिल्लीतील प्रसिद्ध हंसराज कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या.
advertisement
6/8
दिवसा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणं आणि संध्याकाळी दूरदर्शनवर येऊन देश-विदेशातील बातम्या सांगणं, अशी कसरत त्यांनी अनेक वर्ष अत्यंत कौशल्याने केली. आज सोशल मीडियावर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या प्रेमळ स्वभावाच्या आणि साध्या राहणीमानाच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.
advertisement
7/8
सरला माहेश्वरी यांच्या निधनानंतर एका खास गोष्टीची चर्चा रंगली आहे, ती म्हणजे बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान याच्याशी असलेलं त्यांचं कनेक्शन. ज्या हंसराज कॉलेजमध्ये सरला माहेश्वरी प्राध्यापिका होत्या, त्याच काळात म्हणजे ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात शाहरुख खान तिथे विद्यार्थी म्हणून शिक्षण घेत होता, असे सांगितले जाते.
advertisement
8/8
इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी शाहरुखने याच महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजच्या वर्गात एक शिस्तबद्ध शिक्षिका आणि टीव्हीवर एक प्रगल्भ निवेदिका अशा दोन्ही भूमिकांत त्यांनी अनेक पिढ्यांना घडवलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sarla Maheshwari: कोण होत्या सरला महेश्वरी, ज्यांनी पाहिला B/W ते कलर टीव्हीपर्यंतचा प्रवास? शाहरुख खानशी खास कनेक्शन