मराठीतही नाही बोल्डनेसची कमी, श्रुती मराठी ते तेजस्विनी पंडित; चर्चेत आलेले Hot Kissing Scenes
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Marathi Movie Kissing Scene : मराठीतही बोल्डनेसची कमी नाहीये. अगदी स्वप्निल जोशी, ललित प्रभाकर पाहून मुक्ता बर्वे, सई ताम्हणकर ते हृता दुर्गुळे यांच्यापर्यंत अनेक कलाकारांनी सिनेमात किसिंग सीन्स दिलेत. त्यातील चर्चेत आलेले किसिंग सीन्स कोणते आहेत पाहूयात.
advertisement
1/9

बॉलिवूडमधील किसिंग सीनबद्दल बोललं तर आता अशा एकही सिनेमा नाहीये ज्यात हॉट, बोल्ड आणि किसिंग सीन्स दिसणार नाहीत. प्रत्येक सिनेमात एकतरी रोमँटीक सीन असतोच. पण बॉलिवूडचं काय घेऊन बसलात. मराठीतही बोल्डनेसची कमी नाहीये. अगदी स्वप्निल जोशी, ललित प्रभाकर पाहून मुक्ता बर्वे, सई ताम्हणकर ते हृता दुर्गुळे यांच्यापर्यंत अनेक कलाकारांनी सिनेमात किसिंग सीन्स दिलेत.
advertisement
2/9
मितवा सिनेमात अभिनेता स्वप्निल जोशी आणि सोनाली यांचा किसिंग सीन आहे. जवळपास 10 सेकांदांच्या या किसींनने सगळ्यांची झोप उडवली होती.
advertisement
3/9
जोगवा - राजीव पाटील दिग्दर्शत जोगवा या मराठी सिनेमात अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि उपेंद्र लिमये यांचा किसिंग सीन आहे. दोघांच्या या सीनवर जीव रंगला हे सुंदर गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. या सिनेमाला नॅशनल अवॉर्ड मिळाला होता.
advertisement
4/9
अनवट - ऑफस्क्रिन क्यूट कपल म्हणून ओळखले जाणारे अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांनी अनवट या सिनेमात ऑनस्क्रिन रोमान्स केला आहे. त्यात त्यांचा किसिंग सीनही आहे. शुभमंगल सावधान या सिनेमातही आदिनाथ आणि उर्मिला यांनी ऑनस्क्रिन रोमान्स केला होता.
advertisement
5/9
पुणे 52 - अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच तिच्या बोल्ड आणि स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत राहिली आहे. हिंदीच नाही तर सईनं मराठीतही अनेकदा किसींग सीन्स, रोमँटीक सीन्स दिलेत. गिरिष कुलकर्णी यांच्याबरोबर पुणे 52 सिनेमात सईचे अनेक बोल्ड सीन्स आहेत. दोघांचे किसिंग सीन्सही पाहायला मिळतात. दुनियादारी सिनेमा सई ताम्हणकर आणि अभिनेता स्वप्निल जोशी यांचा किसिंग सीन आहे. हा सीन देखील अनेकदा चर्चेत आला आहे.
advertisement
6/9
तप्तपदी या सिनेमात अभिनेता कश्यप परूळेकर आणि अभिनेत्री श्रृती मराठे यांचा हॉट रोमँटीक तसंच किसिंग सीन आहे. याच सिनेमा अभिनेता कश्यम परूळेकर वीणा जामकरबरोबर देखील रोमान्स करताना दिसतो.
advertisement
7/9
अलिकडेच आलेला हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर यांचा आरपार हा सिनेमा देखील मोस्ट रोमँटीक मराठी सिनेमा आहे. या सिनेमात दोघांचे अनेक रोमँटीक आणि किसिंग सीन्स आहेत. सिनेमाच्या शेवट हा दोघांच्या लाँग किसिंग शॉटने होतो.
advertisement
8/9
सिद्धार्थ चांदेकर मृण्मयी देशपांडे यांच्या मिस यू मिस्टर सिनेमात किसिंग सीन आहे. दोघांचे अनेक इंटिमेट सीन्सही पाहायला मिळतात.
advertisement
9/9
समांतर या वेब सीरिजमध्ये अभिनेता स्वप्निल जोशी आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांचा लाँग किसिंग सीन आहे. या सीरिजच्या दुसऱ्या पार्टमध्ये स्वप्निलचा सई ताम्हणकरबरोबरही किसिंग सीन पाहायला मिळतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मराठीतही नाही बोल्डनेसची कमी, श्रुती मराठी ते तेजस्विनी पंडित; चर्चेत आलेले Hot Kissing Scenes