'मी लहानपणापासूनच चोर आहे'; इथे तिहार जेलमध्ये भोगतोय तुरुंगवास, तिथे राजपाल यादवचं शॉकिंग स्टेटमेंट, इंडस्ट्रीत खळबळ
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Rajpal Yadav Controversy: सध्या इंटरनेटवर राजपाल यादव यांच्या एका जुन्या विधानाने चांगलंच वादळ उठवलंय. ९ कोटींच्या या आर्थिक गुन्ह्याच्या चर्चेत राजपाल स्वतःला 'चोर' म्हणताना दिसत आहेत.
advertisement
1/10

बॉलिवूडचा 'छोटा पंडित' अर्थात राजपाल यादव सध्या एका गंभीर संकटात सापडले आहेत. ९ कोटींच्या चेक बाऊन्स प्रकरणी दिल्लीच्या तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या राजपाल यांच्याबद्दल रोज नवनवीन खुलासे होत आहेत.
advertisement
2/10
पण सध्या इंटरनेटवर राजपाल यादव यांच्या एका जुन्या विधानाने चांगलंच वादळ उठवलंय. ९ कोटींच्या या आर्थिक गुन्ह्याच्या चर्चेत राजपाल स्वतःला चोर म्हणताना दिसत आहेत. नक्की काय होतं ते प्रकरण?
advertisement
3/10
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ राजपाल यादव यांच्या एका जुन्या मुलाखतीतील आहे. सुमारे अडीच वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध हिंदी वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत राजपाल यांना त्या ५ कोटींच्या कर्जाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
advertisement
4/10
मुलाखतकाराने विचारलं होतं की, "ज्यांच्याकडून तुम्ही पैसे घेतले, त्या तक्रारदाराने तुम्हाला चोर म्हटलंय, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे?"
advertisement
5/10
या प्रश्नावर राजपाल यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते, "चोर तर मी आहेच भाऊ. लहानपणापासून मोठा चोर आहे आणि छलिया सुद्धा. कारण ज्या मैफिलीत मी उभा राहतो, तिथल्या लोकांची मनं चोरतो. लोकांचं हृदय चोरण्याची ही सवय मला जन्मत: आहे आणि ती कायम राहील."
advertisement
6/10
राजपाल यांनी हे विधान विनोदी ढंगात केलं होतं, पण सध्याच्या परिस्थितीत हे जुनं विधान वेगळ्याच अर्थाने व्हायरल केलं जातंय. राजपाल यादव यांनी जरी तेव्हा चेष्टेने स्वतःला चोर म्हटलं असलं, तरी प्रत्यक्षात मात्र आता त्यांना कायदेशीर कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी मोठी कसरत करावी लागतेय.
advertisement
7/10
गुरुवारी दिल्ली हायकोर्टात त्यांच्या जामिनावर सुनावणी झाली, पण कोर्टाने त्यांना तुर्तास कोणताही दिलासा दिला नाही. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवार, १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
advertisement
8/10
महत्त्वाची बाब म्हणजे, या कठीण काळात बॉलिवूडचे अनेक बडे स्टार्स राजपाल यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. सलमान खान, अजय देवगण आणि सोनू सूद यांनी दिलेल्या आर्थिक पाठबळामुळे राजपाल यादव यांची थकीत रक्कम लवकरच फेडली जाण्याची शक्यता आहे. जर सोमवारी या पैशांचा व्यवहार पूर्ण झाला, तर राजपाल यांना जामीन मिळण्याची दाट चिन्हे आहेत.
advertisement
9/10
ज्या अभिनेत्याने आपल्या अभिनयाने कोट्यवधी प्रेक्षकांची मनं चोरली, तोच आज ९ कोटींच्या देण्यापायी तुरुंगात आहे, हे पाहून चाहते हळहळत आहेत.
advertisement
10/10
राजपाल यांनी त्या मुलाखतीत पुढे असंही म्हटलं होतं की, "हा ५ कोटींचा आकडा मला किंवा माझ्या हातांना कमकुवत करू शकत नाही. जे आहे ते समोरच बोलेन." आज त्यांची हीच जिद्द आणि इंडस्ट्रीतील मित्रांची साथ त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मी लहानपणापासूनच चोर आहे'; इथे तिहार जेलमध्ये भोगतोय तुरुंगवास, तिथे राजपाल यादवचं शॉकिंग स्टेटमेंट, इंडस्ट्रीत खळबळ