नीलम कोठारी नाही, गोविंदाचं मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर! बायको सुनिता म्हणाली, 'मी जेव्हा रंगेहात...'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sunita Ahuja on Govinda Marathi Actress Affair : अभिनेता गोविंदाचं एका मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांवर त्याची बायको सुनितानं मोठं वक्तव्य केलं आहे.
advertisement
1/9

गोविंदा आणि सुनीता आहुजा मागील काही महिन्यांपासून त्यांच्या डिवोर्समुळे चर्चेत आहेत. दोघांचा डिवोर्स होणार अशा अनेक चर्चा सुरू आहेत. पण गणपतीत दोघांनीही त्या चर्चांना अफवा असल्याचं सांगितलं.
advertisement
2/9
दरम्यान सुनिताकडून गोविंदाच्या अफेअर्सबद्दल अनेकदा बोलणं होत असतं. गोविंदा एका मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात आहे अशा चर्चा आहेत. या चर्चांवर सुनिताने भाष्य केलं आहे.
advertisement
3/9
पारस छाब्राच्या पॉडकास्टमध्ये बोलताना सुनीता आहुजाने गोविंदासोबतच्या तिच्या नात्याबद्दल, त्यांच्या नात्यातील आलेल्या कटूतेबद्दल उघडपणे सांगितलं.
advertisement
4/9
गोविंदाच्या अफेअर्सच्या चर्चा सिने इंडस्ट्री आणि सोशल मीडियापासून लपलेल्या नाहीत. नीलम कोठारी व्यतिरिक्त त्याचे रवीना टंडन आणि करिश्मा कपूरसह अनेक अभिनेत्रींशी नाव जोडलं गेलं होतं.
advertisement
5/9
गोविंदाने अनेक वेळा नीलम कोठारीवर असलेलं त्याचं प्रेम व्यक्त केलं आहे. त्याला सुनीता नाही नीलमसोबत लग्न करायचं होतं. दरम्यान सुनीता आहुजाने गोविंदाच्या एका मराठी अभिनेत्रीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर भाष्य केलं.
advertisement
6/9
सुनीता म्हणाली, "मी हे अनेक वेळा सांगितले आहे आणि मी ते पुन्हा एकदा पुन्हा सांगू इच्छिते. मी फक्त त्याबद्दल ऐकले आहे. मी त्याला रंगेहाथ पकडलेले नाही. मी त्याला रंगेहाथ पकडल्याशिवाय मी काहीही बोलू शकत नाही. मी ऐकले आहे की ती एक मराठी अभिनेत्री आहे."
advertisement
7/9
सुनीताने स्व: कमाईवरही भाष्य केलं. ती म्हणाली, "प्रत्येक महिलेने स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि स्वतःचे पैसे कमवणं महत्वाचं आहे. स्वतःचे पैसे कमवल्यानंतर आनंदाची एक वेगळीच पातळी येते. तुमचा नवरा तुम्हाला पैसे देतो पण तो तुम्ही दहा वेळा मागितल्यानंतरच. तुमची स्वतःची कमाई तुमची आहे."
advertisement
8/9
दरम्यान सुनीताने तिला गोविंदाकडून पाच बीएचकेचं घर हवं आहे असंही सांगितलं. सुनीता, तिची मुलगी आणि मुलगी सध्या चार बेडरूम असलेल्या घरात राहते.
advertisement
9/9
सुनीता म्हणाली, "हे घर आमच्यासाठी खूप लहान आहे. या पॉडकास्टद्वारे, मी म्हणू इच्छिते, 'चिची, मला हॉल असलेले पाच बेडरूमचे एक मोठे घर विकत घे, नाहीतर बघ तुझे काय होते ते."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
नीलम कोठारी नाही, गोविंदाचं मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर! बायको सुनिता म्हणाली, 'मी जेव्हा रंगेहात...'