जुहूत आलिशान बंगला, लग्झरी गाड्यांची मालकीण! गोविंदाच्या बायकोकडे इतका पैसा येतो कुठून, सुनिताचा इनकम सोर्स काय!
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sunita Ahuja Income Source : गोविंदापेक्षा कधी कधी त्याची बायको सुनिताच जास्त भाव खाऊन जाते. गोविंदाच्या संपत्तीबद्दल अनेकदा चर्चा होतात. पण सुनिताची संपत्ती तुम्हाला माहितीये का? तिचा इनकम सोर्स काय?
advertisement
1/11

अभिनेता गोविंदा आणि सुनिता यांच्या डिवोर्सच्या चर्चा सुरू होत्या. पण गणेश चतुर्थीच्या दिवशी दोघे एकत्र आले आणि सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला. गोविंदाची बायको म्हणजे सुनिता मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. त्याआधी देखील ती गोविंदाबरोबर अनेक शोमध्ये दिसली होती.
advertisement
2/11
आजवर गोविंदाच्या करिअरबद्दल आणि त्याच्या संपत्तीबद्दल अनेकदा बोललं गेलं आहे. पण सुनिताबद्दल फार कमी गोष्टी लोकांना माहिती आहेत. सुनिताकडे पाहिलं तर ती तिची लाइफस्टाइल गोविंदापेक्षा बोल्ड आहे. दिसायला देखणी असलेली सुनिता नेहमीच भडक लूकमध्ये असते. सुनिता ना कोणत्या सिनेमात काम करत ना कोणत्या ठिकाणी कामाला जात मात्र तिची संपत्ती अमाप आहे.
advertisement
3/11
सुनिता आहुजाचा जन्म 1967 मध्ये एका पंजाबी कुटुंबात झाला. आता ती 57 वर्षांची आहे. सुनीता यांचं खरं नाव सुनीता मुंजाल आहे. गोविंदा सुपरस्टार होण्याआधी सुनिताबरोबर त्याची लव्हस्टोरी सुरू झाली होती. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले 1987मध्ये त्यांनी लग्न केलं. लग्नाची बातमी एक वर्ष लपवून ठेवली होती. दोघांना टीना आणि यशवर्धन अशी दोन मुलं आहेत.
advertisement
4/11
गोविंदाशी लग्न करण्यापूर्वीही सुनीता आहुजा वांद्र्याला राहत होती. एक श्रीमंत पंजाबी घरातील ती मुलगी आहे. लग्नानंतर तिच्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलल्या. तिची श्रीमंती आणि भव्यता कायम राहिली. तिची माणूसकीही नेहमीच पाहायला मिळाली.
advertisement
5/11
मीडिया रिपोर्ट्सनुसार ती 25 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. जुहूमध्ये तिचा एक आलिशान बंगला आहे. ज्याची किंमत सुमारे 16 कोटी आहे. असे म्हटले जाते की हा बंगला तीन फ्लॅट एकत्र करून बांधला गेला आहे.
advertisement
6/11
सुनिताकडे अनेक ब्रँडेड कार देखील आहेत. एकदा करवा चौथच्या दिवशी गोविंदाने तिला बीएमडब्ल्यू 3 गिफ्ट केली होती.
advertisement
7/11
सुनीताच्या इनकम सोर्सबद्दल बोलायचं झाल्यास, ती एंडोर्समेंट्समधून भरपूर कमाई करते. ती गोविंदासोबत रिअल इस्टेट आणि बाँडमध्येही गुंतवणूक केली आहे. हाही तिच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे.
advertisement
8/11
करण जोहरच्या 'फॅब्युलस लाईव्हज विरुद्ध बॉलीवूड वाइव्हज' या रिअॅलिटी शोसाठी ती चर्चेत असल्याच्या बातम्या आहेत. या शोसाठी ती हो बोलली तर तिचा इनकम सोर्स वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
9/11
सुनिता फॅशन स्टेटमेंटमध्येही खूप पुढे आहे. तिला नेहमीच चमकदार आणि स्टायलिश कपडे, दागिने आणि हेवी मेकअप करण्याची आवड आहे. सुनिता प्रचंड धार्मिक आहे. पण तिला दारू पिण्याची आवड आहे.
advertisement
10/11
तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती दररोज दारू पित नाही पण रविवारी नक्की पिते. सुनिता इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. ग्लॅमरस फोटो शेअर करण्याची एकही संधी ती सोडत नाही.
advertisement
11/11
इंस्टाग्रामवर तिला 18.3 लाख लोक फॉलो करत आहेत. तिने अलीकडेच तिचा यूट्यूब चॅनल देखील सुरू केला आहे. त्यामुळे युट्यूब हा तिचा आणखी एक इनकम सोर्स ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
जुहूत आलिशान बंगला, लग्झरी गाड्यांची मालकीण! गोविंदाच्या बायकोकडे इतका पैसा येतो कुठून, सुनिताचा इनकम सोर्स काय!