OTT Actor: 50 रुपये उधार घेऊन घराबाहेर पडलेला अभिनेता, आज OTT चा किंग, घेतो तगडी फी!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
OTT Actor: बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांत ओटीटी प्लॅटफॉर्म्सने क्रांती घडवली आहे. सिनेमागृहापुरते मर्यादित असलेलं मनोरंजन आता थेट मोबाईल-टीव्हीवर उपलब्ध झालं. या माध्यमामुळे अनेक जुन्या-नव्या कलाकारांना अजून लोकप्रिय केलं.
advertisement
1/8

ओटीटी </a>प्लॅटफॉर्म्सने क्रांती घडवली आहे. सिनेमागृहापुरते मर्यादित असलेलं मनोरंजन आता थेट मोबाईल-टीव्हीवर उपलब्ध झालं. या माध्यमामुळे अनेक जुन्या-नव्या कलाकारांना अजून लोकप्रिय केलं. " width="1200" height="900" /> बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांत ओटीटी प्लॅटफॉर्म्सने क्रांती घडवली आहे. सिनेमागृहापुरते मर्यादित असलेलं मनोरंजन आता थेट मोबाईल-टीव्हीवर उपलब्ध झालं. या माध्यमामुळे अनेक जुन्या-नव्या कलाकारांना अजून लोकप्रिय केलं.
advertisement
2/8
असाच एक अभिनेता जो सध्या ओटीटीचा किंग आहे. ज्याने दमदार अभिनयामुळे ओटीटीवर खळबळ उडवली आहे. एवढंच नाही तर सिनेमा असो किंवा सीरीज त्यांची भूमिका नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकत असते.
advertisement
3/8
आपण बोलत असलेला हा ओटीटी किंग अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून मनोज बाजपेयी आहे. मनोजला आज ओटीटीचा खरा सुपरस्टार मानलं जातं. त्याच्या वेब सिरीज आणि चित्रपटांना प्रेक्षक अक्षरशः डोक्यावर घेतात. द फॅमिली मॅन सीरीजने तर त्याला घराघरात पोहोचवलं.
advertisement
4/8
मनोजचा प्रवास सोपा नव्हता. बिहारमधील एका लहान गावातून आलेल्या या अभिनेत्याला सुरुवातीला फार संघर्ष करावा लागला. एकेकाळी त्याने दिल्लीला जाण्यासाठी घरातून फक्त 50 रुपये उधार घेतले होते.
advertisement
5/8
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मध्ये प्रवेश न मिळाल्याने तो निराश झाला होता. पण त्याच वेळी त्याला बॅरी जॉन यांच्या नाट्यगटात संधी मिळाली आणि तिथूनच त्याचा अभिनय प्रवास उंचावू लागला.
advertisement
6/8
1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या बँडिट क्वीन या चित्रपटातून मनोजने पदार्पण केले. त्यानंतर सत्या, शूल, पिंजर, अलीगढ, गँग्स ऑफ वासेपूर अशा दमदार भूमिका त्याने साकारल्या. पण खरी लोकप्रियता त्याला मिळाली ती ओटीटीमुळे.
advertisement
7/8
द फॅमिली मॅनमधील श्रीकांत तिवारी ही भूमिका त्याच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली. एक गुप्तहेर, एक कुटुंबवत्सल पती आणि पिता या तिन्ही पैलूंना त्याने जबरदस्त न्याय दिला. या मालिकेनं त्याला डिजिटल वर्ल्डचा बादशहा बनवलं.
advertisement
8/8
मनोज आज ओटीटीवरील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. तो एका वेब सिरीजच्या एपिसोडसाठी अंदाजे तब्बल 18 कोटी रुपये मानधन घेतो. त्याची एकूण नेटवर्थ 170 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT Actor: 50 रुपये उधार घेऊन घराबाहेर पडलेला अभिनेता, आज OTT चा किंग, घेतो तगडी फी!