TRENDING:

Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात अचानक बदलली हवा, IMD कडून महत्त्वाचं अपडेट

Last Updated:
Weather alert: पश्चिम महाराष्ट्रात सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचा जोर ओसरला आहे. बुधवारचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/7
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात अचानक बदलली हवा, IMD कडून महत्त्वाचं अपडेट
मध्य भारतातील कमी दाबाची प्रणाली पाकिस्तानकडे सरकून जाताच राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. राज्याच्या अनेक भागात स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने कमाल तापमानात वाढ होत आहे. आज 10 सप्टेंबर रोजी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. परंतु, पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरित राज्यात पुढील 48 तास पावसाच्या उघडिपीची शक्यता आहे.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात मागील 24 तासात 0.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच कमाल तापमानाचा पारा 30.4 अंश सेल्सिअस इतका वाढला. आज पुणे घाटमाथ्यासह उर्वरित पुणे जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावेळी कमाल तापमानाचा पारा 30 अंशापर्यंत राहील.
advertisement
3/7
सातारा जिल्ह्यात मागील 24 तासात 0.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आज साताऱ्यातील कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस राहिल. तसेच पुढील 24 तासांसाठी सातारा घाटमाथ्यासह संपूर्ण सातारा परिसरात हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 0.8 अंश सेल्सिअस पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 28.6 अंश सेल्सिअस वाढले आहे. आज कमाल तापमान 28 अंशावर स्थिर राहिल. तसेच जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
5/7
सोलापूर जिल्हात मागील काही दिवसांपासून पावसाची उघडीप कायम आहे. यामुळे पारा चांगला तापला असून मागील 24 तासात 34.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात कमाल तापमान 33 अंशावर राहिल. तसेच सोलापूर जिल्ह्यात ढगाळ आकाश कायम आहे.
advertisement
6/7
गेल्या 24 तासात सांगली जिल्ह्यामध्ये 0.3 अंश सेल्सिअस पावसाची नोंद झाली. तसेच 29.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज जिल्ह्यातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. यावेळी कमाल तापमान 28 तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
7/7
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असली तरिही बर्‍याच ठिकाणी कमाल तापमान वाढत आहे. राज्यात ऊन-सावल्यांसह ढगाळ वातावरण कायम आहे . सकाळी धुके, पुन्हा हलका पाऊस तसेच दिवसभर ढगाळ वातावरण आणि कधी कडक उन्हाच्या चकटे अशी मिश्र वातावरणाची स्थिती राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात अचानक बदलली हवा, IMD कडून महत्त्वाचं अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल