TRENDING:

IND vs PAK : डोळे दाखवणाऱ्या पाकिस्तानी बॉलरने अखेर बदला घेतलाच, Vaibhav Sooryavanshi च्या मागची साडेसाती सुटेना! पाहा Video

Last Updated:

IND U19 vs PAK U19 Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी आणि आरोन जॉर्ज यांनी पहिल्या विकेटसाठी 47 धावा जोडल्या. वैभव सूर्यवंशी 30 धावांवर बाद झाल्याने टीम इंडियाला पहिला धक्का बसला. तर कॅप्टन आयुष म्हात्रे याला भोळला देखील फोडता आला नाही. तो शुन्यावर बाद झालाय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India U19 vs Pakistan U19 : भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर-19 वर्ल्ड कपच्या सुपर सिक्सचा 12 वा सामना क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे खेळला जात आहे. पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बॅटिंग करताना टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डर ढेपाळल्याचं पहायला मिळालं. वैभव सूर्यवंशी आणि आरोन जॉर्ज यांनी पहिल्या विकेटसाठी 47 धावा जोडल्या. वैभव सूर्यवंशी 30 धावांवर बाद झाल्याने टीम इंडियाला पहिला धक्का बसला. तर कॅप्टन आयुष म्हात्रे याला भोळला देखील फोडता आला नाही. तो शुन्यावर बाद झालाय.
IND U19 vs PAK U19 Vaibhav Sooryavanshi
IND U19 vs PAK U19 Vaibhav Sooryavanshi
advertisement

मोहम्मद सय्यमने काढली वैभवची विकेट

वैभव सूर्यवंशीकडून आजच्या मोठ्या सामन्यात अपेक्षा होती. पण तो या प्रेशर मॅचमध्ये तो टिकू शकला नाही. पाकिस्तानच्या डोळे दाखवणाऱ्या बॉलरने म्हणजेच मोहम्मद सय्यमने वैभवची विकेट काढली अन् मागील मॅचचा बदला घेतला. वैभवने मागील काही सामन्यात त्याला फटकवलं होतं. मात्र, याच बॅटरविरुद्ध वैभव सातत्याने आऊट होताना दिसतोय. पाकिस्तानविरुद्धच्या हाय-प्रेशर मॅचेसमध्ये तो सातत्याने फ्लॉप होत असल्याने आता त्याच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मोठ्या मैदानावर आणि तणावाच्या स्थितीत टिकून राहण्यामध्ये तो कमी पडत असल्याचे या कामगिरीवरून स्पष्टपणे दिसून येत आहे.

advertisement

advertisement

भारतीय टीम बॅकफूटवर

वैभवची स्वस्तात झालेली एक्झिट आणि कॅप्टन आयुष म्हात्रे याला भोपळाही फोडता न आल्यामुळे टीम इंडियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. सुरुवातीलाच दोन महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यामुळे भारतीय टीम बॅकफूटवर गेली. या महत्त्वाच्या लढतीत टॉप ऑर्डर कोसळल्याने मिडिल ऑर्डरवर मोठा दबाव निर्माण झाला असून, पाकिस्तानच्या बॉलर्सनी याचा पुरेपूर फायदा उठवत भारताला अडचणीत आणले.

advertisement

पाकिस्तानविरुद्ध वारंवार अपयश 

दरम्यान, युवा खेळाडूंच्या बाबतीत संयम राखणे ही चांगली गोष्ट असली, तरी पाकिस्तानविरुद्ध वारंवार होणारे अपयश चिंतेचा विषय ठरत आहे. वैभव सूर्यवंशी सारख्या टॅलेंटेड खेळाडूने पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात आपली विकेट फेकल्याने चाहत्यांमध्ये नाराजी आहे. सातत्याने अपयश येत असेल, तर मॅनेजमेंटला त्याच्या जागेबाबत किंवा बॅटिंग पोझिशनबाबत विचार करावा लागेल असे चित्र सध्या दिसत आहे.

advertisement

अंडर-19 टीम इंडिया - आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कॅप्टन), वेदांत त्रिवेदी, विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), कनिष्क चौहान, आरएस अंबरीश, खिलान पटेल, हेनिल पटेल, उधव मोहन, हरवंश पंगालिया, मोहम्मद एनान, दीपेश देवेंद्रन आणि किशन कुमार सिंह.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सांभाळ फूड व्यवसाय, मित्र-मैत्रिणीची जोडी ठरतेय हिट, कमाई तर पाहाच
सर्व पहा

अंडर-19 पाकिस्तान टीम - हमजा जहूर (विकेटकीपर), समीर मिन्हास, उस्मान खान, फरहान यूसुफ (कॅप्टन), अहमद हुसैन, हुजैफा अहसन, मोहम्मद शायान, अब्दुल सुभान, मोमिन कमर, मोहम्मद सय्याम, अली रजा, उमर जैब, अली हसन बलूच, डेनियल अली खान आणि नकाब शफीक.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : डोळे दाखवणाऱ्या पाकिस्तानी बॉलरने अखेर बदला घेतलाच, Vaibhav Sooryavanshi च्या मागची साडेसाती सुटेना! पाहा Video
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल