TRENDING:

February Horoscope: फेब्रुवारीपासून गाडी रुळावर! लॉसमध्ये चाललेल्या 5 राशी पुन्हा फायद्यात, भाग्याचे योग

Last Updated:
February Horoscope: महिन्याच्या सुरुवातीला दिनांक 06 फेब्रुवारी 2026 रोजी शुक्र ग्रह शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राचा हा प्रवेश होताच मिथुन राशीत असलेल्या गुरुसोबत शुक्राचा नवपंचम योग तयार होईल. ज्योतिषशास्त्रात शुक्र आणि गुरू हे दोन्ही अत्यंत शुभ ग्रह मानले जातात. कुंडलीतील पाचवे स्थान ज्ञान आणि प्रेमाचे आहे, तर नववे स्थान भाग्य आणि धर्माचे कारक आहे. या दोन्ही ग्रहांच्या शुभ योगामुळे काही राशींच्या आयुष्यात भाग्योदयाचे संकेत मिळत आहेत.
advertisement
1/5
फेब्रुवारीपासून गाडी रुळावर! लॉसमध्ये चाललेल्या 5 राशी पुन्हा फायद्यात, धनवर्षा
मेष - मेष राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि गुरुचा हा नवपंचम योग अत्यंत फायदेशीर ठरेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना हव्या त्या ठिकाणी नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही पूर्वी केलेले प्रयत्न आता यशस्वी होताना दिसतील. विशेषतः गुंतवणुकीतून या राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होऊ शकतो.
advertisement
2/5
मिथुन - मिथुन राशीच्या व्यक्तींच्या बुद्धिमत्तेत आणि ज्ञानात वाढ होईल. यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्हाला अपेक्षित निकाल मिळतील. तुमची आर्थिक बाजू चांगली होईल आणि कोणाला तरी दिलेले उसने पैसे या काळात परत मिळू शकतात. नशिबाची पूर्ण साथ लाभल्यामुळे तुमची अनेक कामे मार्गी लागतील. 
advertisement
3/5
सिंह - सिंह राशीच्या लोकांना समाजात मानसन्मान मिळेल. या शुभ योगाच्या काळात पूर्वी केलेल्या मेहनतीचा जबरदस्त मोबदला तुम्हाला मिळेल. आर्थिकदृष्ट्या तुम्ही अधिक सक्षम व्हाल. तुमच्या अनेक रखडलेल्या योजना आता पूर्णत्वास जातील आणि व्यापाऱ्यांना मनासारखी व्यावसायिक डील मिळू शकते.
advertisement
4/5
तूळ - तूळ राशीच्या लोकांमध्ये कमालीची सकारात्मक ऊर्जा पाहायला मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात मोठ्या संधी मिळतील. तुमच्या मेहनतीला नशिबाची जोड मिळाल्याने यश सोपे होईल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती येईल आणि आरोग्याबाबत असलेल्या चिंतासुद्धा या काळात दूर होतील.
advertisement
5/5
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्र-गुरुचा नवपंचम योग अत्यंत यशदायक ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ मोठा लाभ घेऊन येईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. ज्यांना स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी ही वेळ अनुकूल आहे. या काळात केलेले प्रवास सुखद आणि फायदेशीर ठरतील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
February Horoscope: फेब्रुवारीपासून गाडी रुळावर! लॉसमध्ये चाललेल्या 5 राशी पुन्हा फायद्यात, भाग्याचे योग
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल