TRENDING:

जेजुरीत भंडाऱ्याऐवजी काठ्यांची उधळण! दुकानदार आणि भाविकांमध्ये तुफान राडा; धक्कादायक घटनेचे PHOTOS

Last Updated:
पुणे : अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गड परिसरात आज एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
advertisement
1/7
जेजुरीत भंडाऱ्याऐवजी काठ्यांची उधळण! दुकानदार आणि भाविकांमध्ये तुफान राडा; PHOTO
ज्या जेजुरीत भंडाऱ्याची उधळण करून 'येळकोट येळकोट'चा जयघोष होतो, तिथेच किरकोळ कारणावरून भंडारा विक्रेता आणि भाविक यांच्यात काठ्यांनी तुफान हाणामारी झाली.
advertisement
2/7
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत असून भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
advertisement
3/7
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जेजुरी गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका दुकानावर भंडारा आणि पूजेचे साहित्य घेण्यावरून वाद सुरू झाला. हा वाद केवळ शब्दांपुरता मर्यादित न राहता त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले.
advertisement
4/7
संतापलेल्या दुकानदारांनी आणि त्यांच्या साथीदारांनी भाविकांना काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल भाविकांनीही प्रतिकार केल्याने परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं.
advertisement
5/7
या हाणामारीचा व्हिडिओ परिसरातील नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, काही लोक हातात दांडके घेऊन एकमेकांवर तुटून पडत आहेत. महिला भाविक आणि लहान मुले या गोंधळामुळे घाबरून सैरावैरा धावताना दिसत आहेत.
advertisement
6/7
या घटनेमुळे गडावर दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. देवस्थान परिसरात अशा प्रकारे गुंडगिरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता भाविकांकडून होत आहे.
advertisement
7/7
जेजुरी देवस्थान समितीनेही या घटनेचा निषेध केला असून, भाविकांना त्रास देणाऱ्या दुकानदारांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
जेजुरीत भंडाऱ्याऐवजी काठ्यांची उधळण! दुकानदार आणि भाविकांमध्ये तुफान राडा; धक्कादायक घटनेचे PHOTOS
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल