प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी आणि सायंकाळी नळ जोडणीच्या कारणावरून दोन गटांत शाब्दिक चकमक झाली होती. मात्र, रात्री साडेनऊच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला. आरोपींनी विजेंद्र भोसले यांच्या घराबाहेर येऊन त्यांना गाठले. आरोपींनी विजेंद्रला पकडून ठेवले आणि मुख्य आरोपी दिनेश भोसले याने हातात असलेल्या कोयत्याने विजेंद्रच्या गळ्यावर जोरदार वार केले. यामध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने विजेंद्रचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
या भीषण हल्ल्यात स्वरूप भोसले, आदेश भोसले आणि ऋषिकेश भोसले हे देखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर भिगवण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने हालचाली करत जनार्दन भोसले आणि महेश भोसले या दोघांना अटक केली आहे. मात्र, घटनेनंतर दिनेश भोसले, योगेश भोसले, राज भोसले आणि नीलेश भोसले हे चौघे फरार झाले आहेत. फरार आरोपींबद्दल महत्त्वाची माहिती हाती लागली असून पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
गावातील किरकोळ वादाचे रूपांतर अशा भीषण हत्येत झाल्याने राजेगाव परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
