उन्हाळा सुरू होताच मोठा धक्का! एसी, फ्रिजसह 'ही' उपकरणं महाग, भाव किती वाढणार?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
उन्हाळा सुरू झालाय. या काळात एसी, कुलर, फ्रिजची प्रचंड मागणी असते. मात्र आता सर्वसामान्यांना मोठा धक्का बसलाय. कारण या इलेक्ट्रिक उपकरणांच्या किंमती प्रचंड वाढू शकतात.
advertisement
1/7

नवी दिल्ली : महागाई ही दिवसेंदिवस वाढतेय. असं असताना आता उन्हाळ्याच्या तोंडावर लोकांना एसी, कूलर, फ्रिज खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणारेत. ज्यामुळे आता सर्वसामान्यांचं बजेट बिघडणार आहे. कारण एसी, फ्रिज, कूलर, टीव्ही अशा इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किंमती वाढल्या आहेत. उपकरणं तयार करण्यासाठी लागणारा खर्च वाढल्याने आणि रुपया कमकुवत झाल्याने टेक प्रोडक्ट महाग होताय. कंपन्या म्हणतात की, आता त्या वाढत्या उत्पादन खर्चाचं ओझं स्वतः घेऊ शकत नाही. ज्यामुळे ते आता त्यांना वस्तूंच्या किंमती या वाढवाव्या लागणार आहेत.
advertisement
2/7
टीव्ही आणि स्मार्टफोनच्या किंमती किती वाढल्या? : दिवाळीच्या काळात जे एंट्री-लेव्हल 5जी फोन हे किमान 10 हजार रुपयांना मिळत होते. ते आता 13 ते 14 हजार रुपयांच्या पार झाले आहेत. पुढच्या तिमाहीमध्ये हा आकडा 17 ते 18 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो. काही ब्रांड्सने संकेत दिलाय की, पुढील 2-3 महिन्यात या किंमती 20 हजार रुपयांच्या जवळपास पोहोचू शकतात.
advertisement
3/7
उदाहरण पाहायचं झाल्यास एक वर्षापूर्वी 6,500 रुपयांना मिळणारा 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही आता 8,500 रुपयांमध्ये विक्री होतोय. मेपर्यंत याच्या किंमती 10 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. ज्यामुळे त्या 2017-18 च्या किंमतींची बरोबरी करतील.
advertisement
4/7
एसी आणि घरगुती उपकरणं होणार महाग : मास-सेगमेंटचे एयर कंडीशनर, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीनच्या किंमतीही पुढच्या महिन्यापासून उच्च स्तरावर जाणार आहेत. ज्यामुळे बारातील याची मागणी कमी होणार की काय असा धोका आहे.
advertisement
5/7
गोदरेज इंटरप्रायजेसचे अप्लायंसेज बिझनेसचे प्रमुख कमल नंदी यांनी म्हटलंय की, 'किंमती विक्रमी उंचीवर पोहोताय. पण ही खुप चिंतेची गोष्ट आहे. जोपर्यंत भीषण उन्हाळ्यामुळे विक्री जास्त वाढत नाही, तोपर्यंत सुरुवातीच्या स्तरावरील मागणी ही कमकुवतच राहण्याची शक्यता असते.'
advertisement
6/7
सोप्या भाषेत समजून घ्यायचं झाल्यास, 3-स्टार 1.5-टन एसीच्या किंमती एप्रिलपासून 37,000-40,000 रुपयांदरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात या किंमती 32,000-34,000 हजार होत्या. म्हणजेच किंमती या झपाट्याने वाढत आहेत.
advertisement
7/7
किंमती का वाढताय? : सामान्यतः जास्त उत्पादन आणि कमी उत्पनादन खर्च असेल तर एंट्री-लेव्हल इलेक्ट्रॉनिकच्या किंमती या घसरतात. मात्र गेल्या 5-6 महिन्यात मेमोरी चिपच्या किमंतीत सातत्याने वाढ होतेय. आखाती देशांमधील युद्धाचा दबाव आणि कमकुवत होत असलेल्या रुपयाने ही स्थिती बदलली आहे. नोव्हेंबर-डिसेंबरनंतर स्मार्टफोन आणि टेलिव्हिजनच्या किंमती दर 30-60 दिवसात वाढताय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
उन्हाळा सुरू होताच मोठा धक्का! एसी, फ्रिजसह 'ही' उपकरणं महाग, भाव किती वाढणार?