TRENDING:

अभिनंदन Dear अहो! सूरज चव्हाणच्या आयुष्यात आनंदी आनंद; बायको संजनाने 10 दिवसांत दिली आणखी एक Good News

Last Updated:
Suraj Chavan Wife Sanjana : सूरज चव्हाणची बायको संजनाने गुढीपाडव्याला ती प्रेग्नंट असल्याच्या आशयाची एक पोस्ट केली होती. बरोबर त्याच्या 10 दिवसांनी तिने आणखी एक गूड न्यूज दिली आहे. ज्याबाबत सूरजनेही पोस्ट केली आहे.
advertisement
1/7
अभिनंदन Dear अहो! सूरज चव्हाणच्या आयुष्यात आनंदी आनंद; बायको संजनाने 10 दिवसांत दिली आणखी एक Good News
बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाणच्या आयुष्यात आनंदीच आनंद आला आहे. काही दिवसांपूर्वीच सूरज चव्हाण बाबा होणार आहे, त्याची बायको संजना प्रेग्नंट असल्याची गूड न्यूज मिळाली. आता संजनाने आणखी एक गूड न्यूज दिली आहे.
advertisement
2/7
संजना ही सूरज चव्हाणच्या मामाची मुलगी आहे. बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन जिंकल्यानंतर सूरजने आधी त्याचं घर बांधलं आणि नंतर दोघांनी लग्न केलं. 29 नोव्हेंबर 2025 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली.
advertisement
3/7
19 मार्च 2025 रोजी गुढीपाडव्यानिमित्त संजनाने फोटोशूट केलं होतं. तिने आपला एक साडीतील फोटो शेअर केला ज्याला तिने ऑडिओ लावला होता. यात ती प्रेग्नंट आहे, अशा आशय होता.
advertisement
4/7
"अजून तू माझ्या पोटात आहेस, पण मी तुझ्या प्रत्येक हालचालीला ओळखते. तू हललास की वाटतं आयुष्य हलकं झालं. आता फक्त तुझी वाट बघतेय. तुझ्या त्या पहिल्या श्वासासाठी आणि त्या छोट्याशा हसण्यासाठी माझं संपूर्ण जग तुझ्यात बसलेलं आहे बाळा.", असं ऑडिओमध्ये ऐकू येतं.
advertisement
5/7
तसंच संजनाने या फोटोशूटमध्ये नेसलेल्या साडीत तिचा बेबी बम्प दिसत असल्याचंही अनेकांनी म्हटलं होतं. त्यामुळे सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार आहे, अशी चर्चा जोर धरू लागली.
advertisement
6/7
संजनाच्या या पोस्टच्या बरोबर 10 दिवसांनी सोशल मीडियावर आणखी एक गूड न्यूज देणारी पोस्ट शेअर केली आहे, ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. संजनाची ही पोस्ट खास सूरजसाठी आहे. संजना पोस्टमध्ये अभिनंदन डिअर अहो, असं म्हणाली आहे. नवरा सूरजचं तिने अभिनंदन केलं आहे. आता हे अभिनंदन कशासाठी असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
advertisement
7/7
सूरज चव्हाण सोशल मीडिया स्टार आहे आणि त्याचे फॉलोअर्स आता 3 मिलियन्स झाले आहे. इतक्या फॉलोअर्सचा टप्पा गाठल्याने संजनाने त्याचं अभिनंदन केलं आहे. सूरजने बायकोची ही पोस्ट आपल्या स्टोरीवर शेअर करत 'धन्यवाद बायको, लव्ह यू टू' असं म्हणत तिचे आभार मानले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अभिनंदन Dear अहो! सूरज चव्हाणच्या आयुष्यात आनंदी आनंद; बायको संजनाने 10 दिवसांत दिली आणखी एक Good News
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल