दादा जाताच कुटुंबाला सावरलं, कणखर दिसणारा पार्थ ऑफिसमध्ये जाताच कोलमडला, मन सुन्न करणारे Photo
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
आज रविवार दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय A/४ राजगड येथे अजितदादा पवार यांचा अस्थिकलश आणण्यात आला.
advertisement
1/9

बुधवारी २८ जानेवारी रोजी अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. अजित पवारांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे.
advertisement
2/9
अजित दादांच्या निधनामुळे संपूर्ण पवार कुटुंब कोसळून गेलं. याचा सर्वात मोठा धक्का अजित पवारांच्या कुटुंबाला बसला.
advertisement
3/9
पण अजित पवारांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार यांनी अशा वाईट परिस्थितीत न डळमळता आपल्या कुटुंबासोबत कणखरपणे उभा राहण्याचं काम केलं.
advertisement
4/9
ज्यावेळी बारामतीत अजित पवारांवर अंत्यसंस्कार सुरू होते. तेव्हा जबाबदार व्यक्तीप्रमाणे पार्थ पवारांनी आपल्या वडिलांवर अंत्यसंस्कार केले. आईला-भावाला आधार दिला.
advertisement
5/9
कुटुंबाला सावरणारा आणि कणखर दिसणारा पार्थचं आज मात्र हळवं रुप समोर आलं आहे.
advertisement
6/9
आज रविवार दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय A/४ राजगड येथे अजितदादा पवार यांचा अस्थिकलश आणण्यात आला.
advertisement
7/9
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते अस्थी कलशाचे पूजन झालं. यावेळी पार्थ पवार देखील उपस्थित होते.
advertisement
8/9
ज्यावेळी पार्थ पवार अजितदादांच्या ऑफिसमध्ये गेले, तेव्हा तिथल्या मोकळ्या खुर्चीकडे पाहून ते कोलमडून गेले. त्यांचं उर भरून आलं. त्यांचा हा मन सुन्न करणारा फोटो समोर आला आहे. यात पार्थ पवार खुर्चीला वंदन करताना दिसत आहेत.
advertisement
9/9
यावेळी पार्थ पवारांनी देखील अजित दादांच्या कलशाचं पूजन केलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
दादा जाताच कुटुंबाला सावरलं, कणखर दिसणारा पार्थ ऑफिसमध्ये जाताच कोलमडला, मन सुन्न करणारे Photo