TRENDING:

भल्या पहाटे रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, घटनेच्या वेळी कुठे होता डायरेक्टर? समोर आली मोठी अपडेट!

Last Updated:
Firing at Rohit Shetty House: मुंबईतील जुहू सारख्या अतिशय हाय-प्रोफाईल भागात असलेल्या रोहित शेट्टीच्या निवासस्थानाबाहेर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली आहे.
advertisement
1/7
भल्या पहाटे रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, घटनेच्या वेळी कुठे होता डायरेक्टर?
बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या खऱ्या आयुष्यात आज पहाटे एका भीषण घटनेने खळबळ उडवून दिली आहे. मुंबईतील जुहू सारख्या अतिशय हाय-प्रोफाईल भागात असलेल्या रोहित शेट्टीच्या निवासस्थानाबाहेर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या हल्ल्यात कोणालाही इजा झालेली नाही, मात्र या घटनेने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली आहे.
advertisement
2/7
मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्रीनंतर म्हणजेच रविवारी पहाटेच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी रोहित शेट्टी यांच्या घराच्या दिशेने चार ते पाच राऊंड फायर केले. गोळ्यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला आणि तातडीने पोलिसांना बोलावण्यात आले.
advertisement
3/7
या घटनेनंतर सोशल मीडियावर रोहित शेट्टींच्या घराबाहेरचे व्हिडिओ व्हायरल झाले असून, तिथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असलेला दिसत आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या तपासात सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित आरोपी स्पष्टपणे दिसत आहे. तो आरोपी गोळीबार करण्यापूर्वी परिसराची रेकी करत होता आणि सिगारेट ओढतानाही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
advertisement
4/7
आरोपीने चालता चालता घराच्या दिशेने गोळ्या झाडल्या आणि तो पसार झाला. या हल्ल्यात इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील जिमच्या काचेलाही गोळी लागल्याचे समोर आले आहे. सध्या क्राईम ब्रांचच्या ५ ते ६ टीम या प्रकरणाचा तपास करत असून पुण्यातील वारजे आणि धायरी परिसरातून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचीही चर्चा आहे.
advertisement
5/7
ज्यावेळी हा गोळीबार झाला, त्यावेळी रोहित शेट्टी स्वतः घरामध्ये उपस्थित होते. या हल्ल्यामागचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नसला, तरी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामागे एखाद्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
advertisement
6/7
सोशल मीडियावर काही गुन्हेगारी टोळ्यांच्या नावाने पोस्ट व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये बॉलीवूडला इशारा देण्यात आला आहे. या आंतरराष्ट्रीय टोळ्यांनी यापूर्वीही सलमान खान आणि इतर बड्या कलाकारांना लक्ष्य केलं होतं. त्यामुळे आता रोहित शेट्टींच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
advertisement
7/7
रोहित शेट्टी हे मुंबई पोलिसांचे अत्यंत जवळचे मित्र मानले जातात. त्यांनी पोलिसांच्या मदतीसाठी अनेकदा पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच त्यांच्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे चाहते प्रचंड संतापले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
भल्या पहाटे रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, घटनेच्या वेळी कुठे होता डायरेक्टर? समोर आली मोठी अपडेट!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल