TRENDING:

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे साप्ताहिक राशीफळ; फेब्रुवारी पहिला आठवडा दुहेरी लाभाचा

Last Updated:
Weekly Horoscope: फेब्रुवारी 2026 चा पहिला आठवडा ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींमुळे काही राशींसाठी सुखाचा, तर काहींसाठी संघर्षाचा ठरणार आहे. या आठवड्यात कुंभ राशीत शुक्र आणि बुध ग्रहाची युती होत आहे, तर मकर राशीत सूर्य आणि मंगळ एकत्र आल्याने 'आदित्य मंगळ योग' तयार होत आहे. या शुभ योगांचा प्रभाव मेष, सिंह आणि कुंभ राशींवर चांगला पडेल, तर इतर काही राशींना सावध राहावे लागेल. आठवडा मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे साप्ताहिक राशीफळ जाणून घेऊ.
advertisement
1/6
मेष वृषभ मिथुन कर्क साप्ताहिक राशीफळ; फेब्रुवारीचा पहिला आठवडा डबल लाभाचा
मेष- फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मेष राशीच्या व्यक्तींमध्ये प्रचंड उत्साह आणि ऊर्जा पाहायला मिळेल. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ सध्या शनीच्या मकर राशीत असल्याने तुमची कार्यक्षमता वाढेल. आर्थिक लाभाच्या दृष्टीने हा आठवडा खूप चांगला आहे. धनवृद्धीचे अनेक मार्ग मिळत जातील. आठवड्याच्या मध्यात थोडा शारीरिक किंवा मानसिक ताण जाणवू शकतो, त्यामुळे अनावश्यक वादात पडू नका. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल आणि परदेशी शिक्षणाची संधी मिळू शकते. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील आणि पदोन्नतीचे संकेत मिळतील.
advertisement
2/6
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा संथ असू शकतो. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र सध्या मकर राशीत मंगळ आणि सूर्यासोबत असल्याने कामात आळस जाणवेल. कार्यक्षेत्रात जबाबदाऱ्यांचे ओझे वाढू शकते, पण तुम्हाला सहकारी आणि वरिष्ठांची मदत लाभेल. वातावरणातील बदलांमुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात, विशेषतः थंडी आणि प्रदूषणामुळे त्रास होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलताना शब्द जपून वापरा आणि रागावर नियंत्रण ठेवा.
advertisement
3/6
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्याची साथ देणारा ठरेल. तुमच्या राशीचा स्वामी बुध या आठवड्यात कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे नवीन लोकांशी गाठीभेटी होतील, ज्याचा फायदा तुमच्या भविष्यातील कामात होईल. धनलाभाचे उत्तम योग असून घर किंवा वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
advertisement
4/6
मिथुन राशीच्या लोकांनी आठवड्याच्या मध्यात आरोग्याची काळजी घ्या आणि खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. अचानक प्रवासाचे योग येतील जे फायदेशीर ठरतील. जोडीदारासोबतचे नाते अधिक मधुर होईल आणि सोशल मीडियाद्वारे एखादी गोड बातमी मिळेल.
advertisement
5/6
कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मध्यम फलदायी राहील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कौटुंबिक विषयांवरून घरात मतभेद होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मानसिक ताण वाढेल. तुम्ही हाती घेतलेल्या कामात काही तांत्रिक अडथळे येऊ शकतात, पण संयमाने काम केल्यास यश मिळेल.
advertisement
6/6
कर्क राशीच्या नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमध्ये कामाचा ताण जाणवेल आणि सहकाऱ्यांशी छोटे-मोठे वाद होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात घरातील मोठ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे साप्ताहिक राशीफळ; फेब्रुवारी पहिला आठवडा दुहेरी लाभाचा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल