Weather Alert: मराठवाड्यात हवा बदलली, छ. संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांचा हवामान अंदाज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील हवामानात सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मोठे बदल जाणवत आहेत. छ. संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/5

राज्यात गेल्या 48 तासांपासून पावसाचा जोर ओसरू लागला आहे. कोकणासह मराठवाड्यात देखील पावसाचा जोर कमी झाला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या सुरवातीला मराठवाड्यात पवसाची तीव्रता जास्त होती. आता मात्र हवामानात बदल जाणवत असून पावसाने ब्रेक घेतल्याचे चित्र आहे. आज 10 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांतील हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
2/5
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी आज बुधवारी कोणत्याही जिल्ह्याला सतर्कतेचा कुठलाही अलर्ट हवामान विभागाने जारी केला नाही. छत्रपती संभाजीनगरसह परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या 5 जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहणार आहे. या काळात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
मराठवाड्यातील जालना, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये ऊन सावलीचा खेळ सुरू आहे. आज देखील 3 जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम सूर्यप्रकाश तर काही ठिकाणी आभाळ दाटलेले असणार आहे. त्यामुळे दमट वातावरण देखील निर्माण होऊ शकते. अशा वातावरणात सर्व नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
advertisement
4/5
गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9 तालुक्यातील रस्त्यांवर खड्डे झाले आहेत. पावसामुळे सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा - गोठणपुरा रस्ता चिखलमय झाला असून नागरिकांची गैरसोय होत आहदे. त्यामुळे तात्काळ येथे रस्ता करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
advertisement
5/5
पावसाने आता काही प्रमाणात उघडीप दिल्यामुळे, शेतकऱ्यांच्या प्रलंबित कामांना गती मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले. ढगाळ वातावरणामुळे संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. त्यामुळे विशेषतः वृद्ध आणि बालकांची काळजी घेणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: मराठवाड्यात हवा बदलली, छ. संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांचा हवामान अंदाज