TRENDING:

Weather Alert: कोकणातील हवामानात मोठे बदल, मुंबई, ठाणे, पालघरला आज कोणता अलर्ट?

Last Updated:
Weather Alert: सप्टेंबरच्या सुरुवातीलाच कोकणात जोरदार पाऊस झाला. आता मात्र हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/5
Weather Alert: कोकणातील हवामानात मोठे बदल, मुंबई, ठाणे, पालघरला आज कोणता अलर्ट?
सप्टेंबरची सुरुवात दमदार पावसाने झाली होती, पण आता हवामानात मोठा बदल दिसून येतोय. गेले दोन महिने मुसळधार पावसाने कोकण किनारपट्टीला अक्षरशः झोडपून काढलं होतं. रस्ते जलमय, गाड्या उशिरा, शाळा-कार्यालये बंद अशा परिस्थितीचा सामना करावा लागत होता. मात्र आता पावसाने थोडा ब्रेक घेतला असून 10 सप्टेंबरला कोकणातील प्रमुख जिल्ह्यांच्या हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
2/5
मुंबईत आज हवामान तुलनेने शांत राहणार आहे. गेल्या काही दिवसांतील पावसाच्या तुलनेत आज मोठा दिलासा आहे. सकाळी वातावरण ढगाळ राहील, अधूनमधून रिमझिम सरी येतील, पण मुसळधार पावसाचा धोका नाही. कमाल तापमान 30°C आणि किमान तापमान 25°C राहील. वाऱ्याचा वेग ताशी 10–12 किमी असेल.
advertisement
3/5
ठाणे व नवी मुंबईत आज हवामान ढगाळ राहणार असून काही ठिकाणी हलक्या सरी दिसतील. मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज नाही. कमाल तापमान 29°C ते 30°C दरम्यान राहील. वाऱ्याचा वेग 12 किमी प्रतितास असेल. नागरिकांनी निर्धास्तपणे दैनंदिन कामे पार पाडू शकतात.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात आज हवामान सौम्य राहील. अधूनमधून रिमझिम स्वरूपाच्या सरी येण्याची शक्यता आहे, पण कोणताही अलर्ट नाही. दिवसभर वातावरण ओलसर आणि ढगाळ राहील. कमाल तापमान 28°C आणि किमान 24°C राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
5/5
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर दिसणार नाही. काही भागांत हलक्या सरी येतील, पण आज मुसळधार पावसाचा अंदाज नाही. तापमान 29°C ते 31°C दरम्यान राहील आणि वाऱ्याचा वेग सौम्य असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: कोकणातील हवामानात मोठे बदल, मुंबई, ठाणे, पालघरला आज कोणता अलर्ट?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल