अजितदादांना बालपणी खेळाची आवड
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आशाताई पवार अजित पवार यांच्या बालपणाविषयीचे किस्से सांगताना दिसत आहेत. यामध्ये आशाताईंनी अजित पवार यांची जिद्दीचा एक भन्नाट किस्सा सांगितला. अजित पवार यांना बालपणी खेळाची आवड होती. खासकरून त्यांना बालपणी गोट्या खेळायला पोरं बोलवायची. जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत अजितदादा खेळ सोडत नसायचे. कितीही गाडीत बस म्हटलं तरी जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत ते गाडीत बसायचे नाहीत, असा किस्सा त्यांच्या आईंनी सांगितला.
advertisement
जिंकण्याची वृत्ती कामी आली
हो आई येतो... हो आई येतो... म्हणत अजित पवार खेळात जिंकूनच येयचे, असं त्यांच्या आई सांगतात. पुढे राजकारणात देखील त्यांना जिंकण्याची ही वृत्ती कामी आली. अजित पवार जिथं भाषणाला येतील, तिथली सीट जिंकली म्हणून समजा, असा त्यांचा मानस होता. तसेच एखाद्याचा पाडायचं म्हटलं तर ते मी करतोच, हा अजित पवारांचा मंत्र देखील जिंकण्याच्या जिद्दीतून आला असावा.
कामाचा माणूस...
दरम्यान, आज अजित पवार आपल्यात नाहीत पण त्यांची काम करण्याची धडाकीची शैली आजही लोकांच्या मनात आहे. कामाचा माणूस म्हणून त्यांनी आपली नवी ओळख निर्माण केली. हीच ओळख कायम महाराष्ट्राच्या स्मरणात राहिल.
