TRENDING:

मराठी की अमराठी? दुसऱ्या लग्नासाठी कसा मुलगा हवा? तेजश्री प्रधानने सांगितल्या Dream Husband च्या क्वालिटी

Last Updated:
Tejashree Pradhan Second Marriage : तेजश्री प्रधानच्या दुसऱ्या लग्नाबद्दलच्या विचारांमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
advertisement
1/6
तेजश्री प्रधानने सांगितल्या Dream Husband च्या क्वालिटी
मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान तिच्या अभिनयासोबतच तिच्या खासगी आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असते. २०१५ मध्ये तिचा घटस्फोट झाल्यानंतर तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते.
advertisement
2/6
आता तिची नवी मालिका 'विण दोघातली ही तुटेना' सुरू झाल्यापासून तिची एक जुनी मुलाखत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, ज्यात तिने लग्नाबद्दल अनेक प्रश्नांची मनमोकळी उत्तरं दिली आहेत.
advertisement
3/6
तेजश्री प्रधानचं पहिलं लग्न अभिनेता शशांक केतकरसोबत झालं होतं, पण त्यांचं नातं जास्त काळ टिकलं नाही. दुसऱ्या लग्नासाठी तिला 'मराठी की अमराठी' जोडीदार हवा, असा प्रश्न विचारला असता, तिने एक खूप महत्त्वाचं उत्तर दिलं.
advertisement
4/6
ती म्हणाली, "मला मराठी मुलगा मिळाला तर आनंदच होईल, पण प्रेमाला भाषेचं कोणतंही बंधन नसतं. कोणीही असो, माझ्यासाठी प्रेमाची व्याख्या खूप मोकळी आहे." तेजश्रीच्या या प्रगल्भ विचारसरणीचं चाहते कौतुक करत आहेत.
advertisement
5/6
तेजश्रीने या मुलाखतीत लग्नाबद्दलच्या तिच्या अपेक्षाही सांगितल्या. ती म्हणाली, "वयाच्या पंचविशीत जोडीदाराकडून खूप अपेक्षा असतात. तो असा हवा, तसा हवा... पण आता आयुष्य पुढे गेल्यावर फक्त एकच गोष्ट महत्त्वाची वाटते, ती म्हणजे एक खरा, प्रामाणिक आणि शेवटपर्यंत साथ देणारा माणूस."
advertisement
6/6
तेजश्रीच्या या प्रामाणिक उत्तरामुळे तिच्या चाहत्यांना ती किती परिपक्व झाली आहे, याचा अंदाज आला आहे. तिचं हे मत अनेक लोकांना विचार करायला लावत आहे. तिच्या याच खुलेपणावर चाहते भरभरून प्रेम करतात. सध्या तिची नवी मालिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मराठी की अमराठी? दुसऱ्या लग्नासाठी कसा मुलगा हवा? तेजश्री प्रधानने सांगितल्या Dream Husband च्या क्वालिटी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल